कुपवाड शहरात एका विद्यार्थ्याला वॅक्सिंगचा ओवर डोस दिल्याने प्रकृती चिंताजनक..
उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल
वॅक्सिंग मुळेच विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याची पालकांचा आरोप.
संबंधितांच्या वर कारवाई करा वसीम नायकवडी यांचा मागणी.
लोकसंदेश न्यूज़ सांगली प्रतिनिधि;
सांगली : कुपवाड शहरातील देशभक्त आर.पी.पाटील हायस्कूलमध्ये इ.९ वीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी इलियास युसुफ नदाफ (वय १३ वर्षे) राहणार कापसे प्लॉट कुपवाड याला.३० तारखेला आशा वर्करने वॅक्सिंन चा ओव्हर डोस दिल्याने त्याच्च्या मेंदूला सूज आली असुन डोळ्याला प्यारीलेस झाले असल्याचे वडील युसुफ नदाफ यांना डॉक्टरनी सांगितले आहे
उपचारासाठी त्या विद्यार्थीला मिरज येथिल खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले .परंतु त्यांचे वडील कपडे विकत असल्यामुळे घरची परिस्थिती बेत्ताची असल्याने त्याला पुन्हा सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यानतंर महापालिकेचे डाँ.पल्लवी पाटील व डाँ.वैभव पाटील यांच्या टिमने सिव्हिल मध्ये येऊन त्या विद्यार्थ्यांची चौकशी करुन पहाणी केली. यावेळी डाँ.पाटील म्हणाले डाँ.ससे व सिव्हिलचे डाँक्टर व महापालिकेचे डाँक्टर या विद्यार्थ्यांवर उपचार करीत आहेत.त्यांची प्रकृती चांगली होईल काळीही काळजी करु नका असे पालकांना त्यांनी सांगितले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसीम गायकवडी म्हणाले...शाळेत लसचा दुसरा डोस दिल्याने हा प्रकार घडला यांची मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी संबंधित पालकांना कोणतीही कल्पना दिली नाही. लस ही आशा वर्करने दिली आहे .यावेळी महानगरपालिकेचे डॉक्टर कोणीच नव्हते. त्या मुलाला आंदोर चक्कर आली होती. असे शाळेकडून पालकांनी सांगितले.पण त्या उपचारासाठी दाखल केल्या नंतर डाँक्टरांनी त्याचा मेंदूला सूज आली असून डाव्या डोळ्याला पॅरलेस झाल्याचे सांगितले .
उपचारासाठी त्या विद्यार्थ्याला सांगितले सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले आहे. संबंधित आशा वर्कर मुख्याध्यापक डॉक्टर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.घटने नंतर पालकांनी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांना फोन वरुन माहीती दिली असता.आमच्या शाळेवर काय कारवाई करणार असाल तर करा ..असे धकादायक विधान काढल्याचे पालकांनी सांगितले व चुकीच्या गतीने पद्धतीने लस देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाच धोका निर्माण करणाऱ्या आशा वर्कर, मुख्याध्यापक व संबंधित अधिकाऱ्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वसीम नायकवडी यांनी केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली