SANGLI
डॉ. मंताडा राजा दयानिधी... सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त.....
शिंदे सरकारचा बदल्याबाबतचा नवीन आदेश रुजू....
अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद येथे बदली.....
सांगली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मंताडा राजा दयानिधी यांची शासनाने नियुक्ती केली.
२०१९ मध्ये डॉ. चौधरी यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. काही महिन्यांतच महापुरावेळी त्यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यानंतरच्या महापूर आणि कोरोना कालावधीतही त्यांच्या, कामाची सर्वत्र प्रशंसा झाली होती. स्वतः डॉक्टर असल्याने कोरोना कालावधीत त्यांनी रुग्णांवरील उपचारांचे चांगले नियोजन केले होते, त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा व रुग्णांना बेड मिळण्याबाबत जिल्ह्यात कोणतीही अडचण आली नव्हती. तीन वर्षांहून अधिक काळ जिल्ह्यात काम केले
अभिजित चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे त्यांनी बदली करण्यात आली आहे. यापूर्वीही डॉ. त्यांची याच पदावर बदली झाली होती.
गेल्या महिन्यात महाविकास आघाडी सरकारने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबादला आयुक्तपदी बदली केली होती, तर सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती केली होती. लवकरच जिल्ह्याची सूत्रे घेणार...मात्र, नव्या शिंदे सरकारने या बदली स्थगिती दिली होती. आता पुन्हा चौधरी यांना औरंगाबाद येथेच नियुक्ती देण्यात आली आहे.
डॉ. मंताडा राजा दयानिधी मूळचे तेलंगणाचे आहेत
त्यांचे शिक्षण एम बी बी एस. झाले आहे. ते २०१४ बॅचचे आय.ए एस. अधिकारी आहेत. नाशिक जिल्ह्यातून त्यांनी सेवेस प्रारंभ केला होता...
नंतर ते चंद्रपूर येथे आदिवासी कल्याण विभागात कार्यरत होते. तेथून गोंदिया जिल्हा परिषदेचे त्यांनी काम केले.
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्तपदी कार्यरत होते. ...आता सांगलीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली