रायगड महाड तालुक्यातील तळिये येथे दरडीखालील मृतांना अभिवादन करण्यासाठी माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केला दौरा. शिवसेना बंडखोर आमदार भरत गोगावले देखील उपस्थित ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

रायगड महाड तालुक्यातील तळिये येथे दरडीखालील मृतांना अभिवादन करण्यासाठी माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केला दौरा. शिवसेना बंडखोर आमदार भरत गोगावले देखील उपस्थित ...



RAYGAD
लोकसंदेश प्रतिनिधी श्याम लोखंडे

रायगड महाड तालुक्यातील तळिये येथे दरडीखालील मृतांना अभिवादन करण्यासाठी माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केला दौरा.

शिवसेना बंडखोर आमदार भरत गोगावले देखील उपस्थित होते



रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळिये येथे गेल्या वर्षी २२ जुलै २०२१ रोजी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन तब्बल ८६ जणांना जीवंत समाधी मिळाल्याची दूर्घटना झाली होती.


या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री व श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील आ. अदिती तटकरे यांनी दरडी खालील मृतांना अभिवादन करण्यासाठी आज दिनांक २२ जुलै रोजी शुक्रवारी सकाळी दौरा केला.


यावेळी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद व महाड विधानसभा मतदारसंघातील आ. भरत गोगावले हे देखील मृतांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली