SANGLI
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रदीप साठे यांची निवड.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीची बैठक वाटेगाव, येथे पार पडली या वेळी वाटेगावचे सुपुत्र शाहू, फुले, आंबेडकर, सत्यशोध अण्णा भाऊ साठे, यांच्या विचारांचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप साठे यांची सर्वानुमते सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली
तर जिल्हा उपाध्यक्षपदी आबा सुहासे यांची निवड करण्यात आली. या निवडी वाटेगावचे सरपंच सुरेश साठे, बहुजन नेते संदीप पाटोळे, ज्येष्ठ नेते सतीश मोहिते, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर गायकवाड, सांगली शहर अध्यक्ष गॅब्रीयल तिवडे, युवा नेते दयानंद चव्हाण यांच्या कोअर कमिटीच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी प्रशांत आवळे, निशिकांत आवळेकर, प्रशांत सदामते, सलीम सय्यद, अर्जुन लोंढे, सचिन मोहिते, विपूल सुहासे, यांच्यासह सांगली जिल्ह्यातून युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही दिवसातच जयंती उत्सव समितीच्या वतीने तालुका व जिल्हा स्तरावती कमिटी नेमून वर्षभरातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे, असे संदीप पाटोळे यांनी सांगितले
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली