अती जलद ....फक्त पाच महिन्यात ब्रिटिशकालीन पूल नव्या रुपात वाईकराच्या सेवेत....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अती जलद ....फक्त पाच महिन्यात ब्रिटिशकालीन पूल नव्या रुपात वाईकराच्या सेवेत....
SATARA/VAI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

अती जलद ... फक्त पाच महिन्यात ब्रिटिशकालीन पूल नव्या रुपात वाईकराच्या सेवेत....

आमदार मकरंद पाटील यांचे हस्ते या पुलावरच्या वाहतुकीचा शुभारंभ आज करण्यात आला..

वाईकराची लाईफलाईन आणि अनेक घटनाचा साक्षीदार असलेल्या या ब्रिटिशकालीन पुलास १३६ वर्षे पूर्ण झाली होती ..त्यामुळे तो पूर्णत धोकादायक होता व तसे पत्र ब्रिटिश सरकारने पाठवलं होतं. त्यामुळे तो पाडून त्या ठिकाणी नवीन उभारणीसाठी आ. मकरंद पाटील व वाई नगरपरिषद याच्याकडून निधी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आ. पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून पंधरा कोटी एवढा निधी मंजूर पूर्ण घेण्यात आला होता, मंत्री पवार यांच्या हस्ते याचं भूमिपूजन जानेवारी मध्ये करण्यात आले होते

दरम्यान १८० दिवसात T &T या नामांकित कंपनीने हा पूल बांधून तयार केला आहे

हा पूल लवकर पूर्ण होईल वाईकर नागरिक त्याच्या प्रतिक्षेत होते आज त्यांची प्रतीक्षा पूर्ण झाली...

दरम्यान मुदतीत फुलाचे काम पूर्ण झाल्याने आमदार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला

शिवसेनेचे बडखोर आ. शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.... त्याचा आता सर्वत्र उल्लेख केला जात आहे.... नवीन पुलाच्या शुभारंभप्रसंगीही त्याची अनुभूती आली... आ. मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपल्या कारमधून पुलावरून फेरफटका मारला या वेळी वाईतील एका पत्रकाराने मकरंद पाटील यांच्याकडे पाहून काय हो पूल... काय ती गाडी... काय ते आबा..." अस म्हटल्यानंतर आमदारांनीही काय ते पाणी..." असं म्हणत उस्फूर्तपणे दाद दिल्याने सर्वत्र एकच हशा पिकला... मोठया उत्साहात वाईकर पुलावरून ये-जा करत होते....

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार,दासबापू गायकवाड ,किसनवीर कारखान्याचे कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मदन भोसले, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, भूषण गायकवाड तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, नगरसेवक चरण गायकवाड,भारत खामकर राजेश गुरव ,प्रदीप जायगुडे ,संग्राम पवार ,प्रदीप चोरगे, पंचायत समिती उपसभापती विक्रांत डोंगरे ,आनंद चिरगुटे संदीप डोंगरे, मामा देशमुख, धनंजय हगीर, दीपक हजारे, डी.बी.खरात, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते तसेच मुख्याधिकारी किरण कुमार मोरे, कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी व वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली