जत मधील अपघाताची वाढती संख्या चिंताजनक, योग्य उपायाची प्रतीक्षा ... तुकाराम महाराज....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जत मधील अपघाताची वाढती संख्या चिंताजनक, योग्य उपायाची प्रतीक्षा ... तुकाराम महाराज....



SANGLI 
जत शहर प्रतिनिधी इब्राहिम शेख,

जत मधील अपघाताची वाढती संख्या चिंताजनक, योग्य उपायाची प्रतीक्षा ... तुकाराम महाराज....

मागील सहा महिन्यात जत पोलीस ठाणे अंतर्गत २७ अपघात झाले. त्यात १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उमदी पोलीस ठाण्यातर्गत आठ अपघात झाले असून त्यात सात जणांना आपला अनमोल जीव गमवावा लागला आहे. सहा महिन्यातील अपघातातील मयत व जखमी यांची संख्या चिंताजनक असल्याने वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेणार असल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे तुकाराम बाबा महाराज यांनी केले



तालुक्यातील कोसारी मोहित शिवाजी तोरवे, अजित नेताजी भोसले, राजेंद्र संजय भाले या तिघा तरुणांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या समरणार्थ कोसारी ग्रामपंचायत व विकास संस्था कोसारीकरी यांच्या संयुक्त संकल्पनेतून कोसारीत महाआरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून तुकाराम बाबा महाराज बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, डॉ. शिवाजी खिलारे माजी पंचायत समिती सदस्य श्रीनिवास भोसले युवा नाथा पाटील, सरपंच तानाजी बिसले, उपसरपंच बाळासाहेब पवार, चेअरमन किसन टेंगले, दादा यमगर तानाजी चव्हाण मुख्याध्यापक सावंत ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक टॅगले ग्रामसेवक प्रसान कुंभार, लतीफ मणेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

         जत शहर वाहतूक कोंडी व उपाय

जत शहरात वाहनांची संख्या वाढल्यामुळे शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी वारंवार होत आहे... जत एक व्यापारी गाव आहे.. महाराष्ट्र कर्नाटकचे शेवटचे व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते .. त्यामुळे कर्नाटक ,सोलापूर सांगली व आजूबाजूच्या सर्व भागातून शहरातून ही वाहतूक होत असते. ..  शहरातील अरुंद रस्त्यांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे व वाहतुकीचे नियम पाळले न गेल्यानेच  हे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. . या अपघातावर उपाय म्हणजे वाहनधारक, वाहन चालक यांना प्रबोधन करणे गरजेचे आहे .. साध्या मोटरसायकली वरून सुद्धा ट्रिपल सीट गावात देखील शंभरच्या स्पीडने पळवणारी मुले, तसेच गावातील वाहतुकीचा विचार न करता चालवण्यात  येणारी वाहने, शहरातील अरुंद रस्ते, गावाबाहेरील वेडी वाकडे वळणे व चौकात नसणारे स्पीड ब्रेकर अथवा वाहतुकीच्या अज्ञानातून हे अपघात होत आहेत , याच्यामधून दुःखाची एकच बाब अशी आहे की......एखादीं व्यक्ती आपल्या मार्गाने सरळ जात असेल तरी  ..अशा लोकांच्या मुळे अपघात घडून त्यांच्या घरावर संकट कोसळते  ..जेथे समोरून सरळ जाणाऱ्याचा काहीही संबंध नसतो  ..तर अशा वाहनधारकांना प्रशासनाने कायद्याचा योग्य अंमल व धाक दाखवण्याची वेळ आली आहे, या साठी वाहनधारकांमध्ये प्रबोधन करणे हीच एक बाब आपल्याला या संकटापासून वाचऊ शकते.. आणि याच्यावर विचार होणे फार गरजेचे आहे ..
संपादक ;लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली