KOLHAPUR कुंभोज येथे सकलात साहेब दर्गाचा कलशारोहण समारंभ मुनीर साहेब पिरजादे बागणी यांच्या हस्ते संपन्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR कुंभोज येथे सकलात साहेब दर्गाचा कलशारोहण समारंभ मुनीर साहेब पिरजादे बागणी यांच्या हस्ते संपन्न

कुंभोज येथे सकलात साहेब दर्गाचा कलशारोहण समारंभ मुनीर साहेब पिरजादे बागणी यांच्या हस्ते संपन्न


KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे

कुंभोज तालुका हातकलंगले येथील हिंदू मुस्लिम धर्माचे एकतेचे प्रतीक असणाऱ्या सकलात साहेब दर्ग्याची बांधकाम नुकतेच पूर्णत्वास आले, सदर दर्ग्यावरती विधिवत्य प्रमाणे आज धमगुरु मुनीरसाहेब पिरजादे रोजा शरिफ बागणी, यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशारोहण समारंभ संपन्न झाला धर्मगुरू मुनीर साहेब पिरजादे यांच्या आशीर्वाद वाचनानंतर धार्मिक पठण करण्यात आले. सकाळी नऊ वाजल्यापासून सदर कलशाचे कुंभोज एस.टी. स्टँडवर आगमन झाले. नंतर हजरत शहाकाल साहेब यांच्या दर्ग्यात सदर कलशाची विधिवत्तेपणे पूजा करण्यात आली या ठिकाणी धार्मिकपूजना नंतर कलशाची एस.टी. स्टँड दीपक चौक, मसुदी कट्टा, सुतार मोहला मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांचा गजर व फटाक्याच्या आताशबाजीने संपूर्ण परिसरातील वातावरण भक्तिमय बनले होते.


कलशाच्या मिरवणुकीचे स्वागत कुंभोज परिसरात शिवसेना, युवासेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ,जनसुराज पक्ष्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले, या वेळी जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चांद मुजावर, विवेक पाटील, महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, शरद कारखाना संचालक आप्पासाहेब चौगुले,ग्रामपंचायत उपसरपंच अनिकेत चौगुले,संतोष माळी,इनुस मुजावर,एडवोकेट अमित साजनकर ,शिवसेना अध्यक्ष निवास माने, तेजस कोळी,जहागीर हजरत, सदाशिव महापुरे, दावीत घाटगे आप्पासाहेब पाटील, रवी जाधव, अशोक आरगे, धनाजी तिवडे, महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष अजित गोपोडगे, माजी सरपंच प्रकाश पाटील, तसेच गावातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदर कलशाचे स्वागत हार घालून करण्यात आले.


      धर्मगुरू मुनीर साहेब पिरजादे बागणी यांच्या शुभ हस्ते दुपारी सकलात साहेब दर्ग्यावरती सदर कलश स्थापन करण्यात आला. यावेळी सुतार मोहल्ला तसेच गावातील हिंदू मुस्लिम धर्मातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन "आरमान कंट्रक्शन" राजू सुतार यांच्या वतीने करण्यात आले होते. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुतार मोहल्ला कुंभोज यांच्यावतीने करण्यात आले. या वेळी दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजन सुतार मोहल्ला यांच्या वतीने करण्यात आले होते. या दर्गा बांधकामासाठी मदत करणाऱ्या सर्व दात्यांचा सत्कार या वेळी सुतार मोहल्ला यांच्या वतीने करण्यात आला.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली