सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शिंदे गटात प्रवेशासाठी शिवसेना नगरसेविकेच्या पतीला मारहाण....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शिंदे गटात प्रवेशासाठी शिवसेना नगरसेविकेच्या पतीला मारहाण....SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी इस्लामपूर

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शिंदे गटात प्रवेशासाठी शिवसेना नगरसेविकेच्या पतीस मारहाण....
 
इस्लामपूर, शिवसेना महिला नगरसेविकेच्या पतीला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महत्वाचे म्हणजे शिंदे गटात येण्यासाठी ही मारहाण केल्याचा आरोप महिला नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. तर पोलिसांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
        शिवकुमार दिनकर शिंदे असे शिवसेना महिला                 नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे.


शिवकुमार शिंदें सकाळी किराणामाल आणण्यासाठी दुकानात चालले असता सात ते आठ जणांच्या टोळीने त्यांना अडवून मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचे नगरसेविका पती शिवकुमार शिंदेंनी सांगीतले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून. त्यांना  हॉस्पिटलच्यामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली असून दोन्ही हात आणि पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले.


                     नगरसेविका प्रतिभा शिंदे 

 एकनाथ शिंदे गटातील सांगलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा जखमी शिंदेंनी आरोप केला आहे.

 शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आनंद पवार हे शिंदे गटात प्रवेश करा, अशा धमक्या देत होते. त्यामुळे ही मारहाण झाल्याचे नगरसेविका प्रतिभा शिंदे आणि शिवकुमार शिंदेंनी सांगितले.


तर पोलिसांनी शिंदे गटातील सहा ते सात जणांवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली