सांगली पोलीस फ्युएल स्टेशन पुरविणार २४ तास सेवा ... जनतेच्या सेवेत सत्वर सादर.... रात्रंदिवस पंप चालू राहणार....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली पोलीस फ्युएल स्टेशन पुरविणार २४ तास सेवा ... जनतेच्या सेवेत सत्वर सादर.... रात्रंदिवस पंप चालू राहणार....



SANGLI
लोकसंदेश सांगली प्रतिनिधी
सांगली पोलीस फ्युएल स्टेशन पुरविणार २४ तास सेवा ...
जनतेच्या सेवेत सत्वर सादर....
रात्रंदिवस पंप चालू राहणार....

मा. पोलीस अधीक्षकसो सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस कल्याण कार्यक्रम अंतर्गत पोलीस दलाकडून सांगली पोलीस फ्युएल स्टेशन चालविण्यात येणाऱ्या. सांगली पोलीस फ्युएल स्टेशन ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा करीता नेहमी कट्टीबध्द व प्रसिद्ध आहे  सांगली पोलीस फ्युएल स्टेशन येथे ग्राहकांना योग्य घनतेचे प्रमाणीत मापा प्रमाणे देणेत येत असल्याने ग्राहकांमध्ये पेट्रोल पंप बाबत विश्वासार्हता आहे.


मा. पोलीस अधीक्षक सो सांगली यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाकरीता व नागरीकां करीता वेगवेगळया पोलीस कल्याण योजना राबविल्या आहेत. त्या अनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक सो. सांगली यांनी दिले सूचनां प्रमाणे 
सांगली पोलीस फ्युएल स्टेशन २४ तास सेवा पुरविणार आहे. सांगली व मिरज शहरामध्ये रात्रीचे वेळी कोणताही पेट्रोलपंप सुरु नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अॅम्ब्युलन्स, वैद्यकीय सेवा, बाहेरगावचे प्रवासी तसेच आपतकालीन परिस्थितीमध्ये पेट्रोल पंप २४ तास सुरु ठेवल्यामुळे नागरीकांना मदत होणार आहे. सांगली पोलीस फ्युएल स्टेशन २४ तास खुले राहणार असून नागरीकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा फोन असे आवाहन...
अभिजीत देशमुख,
पोलीस निरीक्षक मानवी संसाधन विभाग सांगली यांनी केले आहे

चक्क पोलिसांचा पेट्रोल पंप ही संकल्पना सांगलीत राबवल्यामुळे सांगलीतील वाहनधारकांना एक दिलासा मिळाला आहे..... असं कळतंय की बाहेरच्या पेट्रोल पंपावर अन्य भेसळ मिश्रित पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होत असल्याचे कळून येतेय... परंतु पोलीस खात्याचाच पेट्रोल पंप असल्यामुळे येथे असे होणे नाही    .त्यामुळे सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनात या विश्वाहर्ता असणाऱ्या पेट्रोल पंपावर  पेट्रोल डिझेल भरून वाहनांची होणारी पुढील नुकसानी टाळा  ....जरी हा पेट्रोल पंप लांब असेल तरी .... विना भेसळ आपल्याला याच्यातून पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे  .... तरी कृपया या पंपावरूनच आपण पेट्रोल डिझेल आपल्या वाहनांमध्ये टाकावित ही विनंती ...
संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली