कोल्हापूरकरांची भाषा जरा रांगडीच आहे .... की... ज्याला समजली त्यालाच समजली.. विषय जरा हार्डच आहे .....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरकरांची भाषा जरा रांगडीच आहे .... की... ज्याला समजली त्यालाच समजली.. विषय जरा हार्डच आहे .....




कोल्हापूर ;
कोल्हापूरकरांची भाषा जरा रांगडीच आहे .... ती... ज्याला समजली त्यालाच समजली...

आता कोल्हापूर म्हटलं की ..त्यामध्ये त्याच्या भाषेत गावरानपण असल तरी आदर युक्त असते ....त्याने एखादी शिवी जरी दिली तर त्या भाषेचा एक भागच असतो ...व तो समोरच्याला आपलेपणा वाटत असतो....


मराठी बाणा कडक असलेल्या पुणेरी पाट्या आम्ही वाचतोच...मात्र. ...
कोल्हापूरकर पण याच्यामध्ये कमी नाहीत....कोल्हापुरातल्या कुठल्याही विषयावर कोल्हापूरकरांची एक वेगळी भूमिका प्रतिक्रिया हार्ड असते...

आता बघा (MH- 09 -- CW 2827) रिक्षावाल्याने कोल्हापुरात आपल्या चक्क रिक्षावर पाण्यात लवकर काय विरघळते??? कोणता पदार्थ विरघळतो??? असा प्रश्न करत त्याचे. . उत्तर लिहिलेले आहे. मीठ व साखर आणि शेवटी उत्तर लिहिलेल आहे....


"महापालिकेच्या रस्त्याचे डांबर" या उत्तरांमध्ये बरंच काही आलेल आहे.

कोल्हापूरकरांची बोलतानाची एक विनोद बुद्धी व याच्यातून एक दिलेला संदेश हा एक वेगळा आहे....

म्हणजे कोल्हापूर मध्ये महापालिकेने जे डांबरी रस्ते केलेत ती सगळी कालच्या पावसात वाहून गेलीत....
शहरातला रिक्षावाला हा गल्लीबोळ आणि आपल्या शहरातच फिरत असतो त्याला त्याच्या रिक्षाची रस्त्याच्या खड्ड्यामुळे होणारी मोडतोड व इतर नागरिकांच्या वाहनांची होणारी दैना त्याला पहाववेली नाही...


त्याच्या नंतर ह्या रिक्षावाल्याला हे सुचलं असावं....

कोल्हापूर महानगरपालिकेवर राज्य गाजवणाऱ्या सत्ताधीशानी ह्या संदेशातून बोध घ्यावा असा हा संदेश आहे....

आता हा संदेश फक्त कोल्हापूरकरानाच लागू होत नाही तर... आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाण्यापासून सांगली, कोल्हापूर, सातारा, नागपूर म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आहे "नेमीच येतो पावसाळा आणि त्याच्यानंतर निघून जाते डांबर..."


हे आमच्या पाचवीला पुजलेल आहे..

आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही सत्ताधीश असले तरी... दरवर्षी येथील जनतेला याचा सोस भोगावाच लागतो...

यातील महत्त्वाची गोम अशी आहे की, काही कंपन्या 10 ते 15 वर्षाच्या गॅरंटीचे रस्ते तयार करून द्यायला तयार आहेत... परंतु हे राजकीय ,पुढारी, सत्ताधीश व अधिकारी त्या कंपन्यांना ही काम देत नाहीत. .. या मागच मोठ लॉजिक अस आहे की, किमान एक दोन वर्षात रस्ता उखडल्यानंतर परत त्या रस्त्यामध्ये आपल्याला पैसे खायला मिळतील..... या उद्देशाने पंधरा वर्षाच्या गॅरंटीचा रस्ता... कोणीही या महाराष्ट्रात कुठलीही नगरपालिका, महापालिका करून घेत नाही ,याच्या मागचं मोठं  इंगित हे आहे .... एका वर्षात उखडलेल्या रस्त्यावर परत नवीन होणाऱ्या  रस्त्यामध्ये अधिकाऱ्यांना व आपल्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना पैसे खायला मिळाले पाहिजेत ....म्हणून पंधरा वर्षाच्या गॅरंटीचे रस्ते केले जात नाहीत यातील या मागचं खरं गुपित हे आहे..


आणि खरच या रिक्षावाल्याने आपल्या पायात कोल्हापुरी पायतान घालून अश्या सत्ताधीशांच्या वर कोल्हापुराची लवंगी मिरची टाईप जो संदेश दिलाय तो  वाखाणण्याजोगा आहे...


महाराष्ट्रातील जनतेला पूर्वाश्रमीचे रिक्षाचा व्यवसाय करणारे मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब हे लाभलेले आहेत... शहरातील या रस्त्यांच्या परिस्थितीमुळे रिक्षावाल्यांचे, मोटरसायकल वाल्यांचे, वाहनधारकाचे काय हाल होतात...हे त्यांना नक्की माहिती आहे ..त्यांनी जर हा संदेश वाचला तर निश्चितपणे महाराष्ट्रातील सर्व रस्ते म्हणजे (गडकरी टाईप) दहा ते पंधरा वर्षाच्या गॅरंटी देणाऱ्या कंपनीला देतील अशी महाराष्ट्राच्या जनतेला आशा आहे...

संपादक ;
लोकसंदेश न्यूज़ मीडिया प्राइवेट लिमिटेड मुंबई, सांगली.
9850155823