उमर फारूक तांबोळी इचलकरंजी प्रतिनिधी
कबनूर नगरपरिषद कृतिसमितीस नगरपरिषद व्हावी या साठी तिरंगा कॉलनी कबनूर यांचा जाहीर पाठिंबा...
कबनूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी कबनूर ग्रामपंचायतीची कबनूर नगरपरिषद करणे कामी, गावातील कृति समितीने गेली ८२ दिवस धरणे आंदोलन सुरु केले आहे. कबनूर गावच्या सध्याच्या भौतिक सुविधा पूर्णपणे कोलमडल्या असून त्यात सुधारणा होऊन गावचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने नगरपरिषद होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करत तिरंगा कॉलनी मधील सर्व रहिवाशानी कबनूर नगरपरिषद व्हावी या साठी सुरु असलेल्या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे...
यावेळी तिरंगा कॉलनीचे अध्यक्ष म्हणाले की, इचलकरंजी लगत असणाऱ्या कबनुर गावांमध्ये खेड्याच्या पलीकडे सुविधा आहेत, ग्रामपंचायत असल्यामुळे शासनाकडून येणारा निधी कबनूरच्या विकासासाठी पुरत नाही .त्यामुळे येथे नगरपरिषद करून या कबनूर गावाचा सर्वांगीण विकास करावा . असे मत त्यांनी व्यक्त केले,यावेळी तिरंगा कॉलनीतील सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच आरपीआय जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती चे सदस्य आयु.उत्तम दादा कांबळे यांनी देखील कबनूर कृती समितीला पाठिंबा जाहीर केला आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली