सभासदांनी घेतलेल्या कर्जावर एक अंकी व्याजदर व चांगला डिव्हिडंट देण्यासाठी संस्था व सर्व संचालक बांधील आहेत - चेअरमन; अर्जुन पाटील, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, कोल्हापूर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सभासदांनी घेतलेल्या कर्जावर एक अंकी व्याजदर व चांगला डिव्हिडंट देण्यासाठी संस्था व सर्व संचालक बांधील आहेत - चेअरमन; अर्जुन पाटील, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, कोल्हापूर



KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे

सभासदांनी घेतलेल्या कर्जावर एक अंकी व्याजदर व चांगला डिव्हिडंट देण्यासाठी संस्था व सर्व संचालक बांधील आहेत - चेअरमन अर्जुन पाटील

  प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर, या पंचवार्षिक निवडणुकीत यश मिळवून विजय झाल्याबद्दल सर्व नूतन संचालकांचा व सुकाणू समिती सदस्यांचा राजश्री शाहू स्वाभिमानी शिक्षकवआघाडी हातकलणगले यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संभाजीराव थोरात ,महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयराव शिंदे उपस्थित होते. वडगाव येथे राजश्री शाहू स्वाभिमानी शिक्षकआघाडी हातकलणगले यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते 


       यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा नेते ज्योतीराम पाटील म्हणाले की बँकेची सध्याची सद्यस्थिती पाहून लवकरात लवकर श्वेतपत्रिका जाहीर केली जाईल सत्ताधारी आगाडीने गेल्या 13 वर्षात कोणालाही विश्वासात न घेता केलेल्या अनागोदी कारभाराला सभासदांनी उत्तर दिले असून परिवर्तन घडवले आहे परिणामी नूतन सर्व संचालकांनी आपल्यावरील जबाबदारीची भान ठेवून सर्वाना संचालकांना विश्वासात घेऊन काम करावे त्यासाठी आपण लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.

      महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ थोरात गट कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील म्हणाले कि, सत्ताधारी आघाडीने मागील काळात बँकेत दाखवलेला नफा हा चुकीचा असून प्रत्यक्ष दर्शनी तो नफा वेगळाच आहे त्याची नूतन संचालक यांनी चौकशी करून सर्वसामान्य सभासदाची हीत जोपासनेचे काम करावे.

         दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक नूतन चेअरमन अर्जुन पाटील म्हणाले की,आम्ही सर्वांना सोबत घेऊन सुखाणू समितीच्या सल्ल्यानुसार बँकेचा कारभार चालवणार असून त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. सभासदांनी घेतलेल्या कर्जावर एक अंकी व्याजदर व चांगला डिव्हिडंट देण्यासाठी संस्था व सर्व संचालक बांधील आहेत त्या दृष्टीने संस्थेचा कारभार उल्लेखनीय करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील.



          यावेळी शिक्षक समितीच्या सातव्या वर्धापनानिमित्त संस्थापक भावा शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन सुकानु समितीचे सर्व सदस्य व नूतन बँकेचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले .यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्तेप्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नूतन चेअरमन अर्जुन पाटील व व्हाईस चेअरमन पद्मजा मेढे पाटील यांचा सत्कार सुकाणू समिती ज्योतीराम पाटील व रवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  हातकणगले तालुका शिक्षक समितीच्या वतीने सर्व सुकाणू समिती व नूतन बँकेच्या संचालकांचा सत्कार  करण्यात आला. यावेळी बाजीराव पाटील ,बाळासो पवार,रघु खोत, विलास चौगुले संजय कुंभार ,मारुती पाटील, अनिल नलवडे ,मानीक कागवाडे, सागर पाटील सतीश जयकर ,भगवान जंगम, भानुदास वसगडे स्वागत प्रास्ताविक कृष्णात पाटील सूत्रसंचालन माणिक कागवडे यांनी केले 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली