SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली.
सांगलीत हळद व्यापाऱ्याच्या घरासमोर 'स्वाभिमानी'चा शंखध्वनी....
हळद व्यापारी राजकुमार सारडाचा साताऱ्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींचा गंडा
सांगलीतील राजकुमार सारडा यांनी शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढून सारडांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन केल. शेतकऱ्यांनी ठिय्या मारला होता. तत्काळ पैसे दिले नाही तर सारडा यांच्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.या वेळी सारडा चा निषेध करत शंखध्वनी केला.
या वेळी महेश खराडे म्हणाले की, सारडा यांनी चार वर्षांपूर्वी वाई, कोरेगावसह सातारा जिल्ह्यातील २०० शेतकऱ्याची दोन कोटींची हळद खरेदी केली. मात्र गेल्या चार वर्षांत एक रुपयाही त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला नाही. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले धनादेश देखील वटले नाहीत. त्याच्या मनमानीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सारडा यांनी तात्काळ पैसे द्यावेत अन्यथा घरात ठिय्या मारू, असा इशारा त्यांनी दिला.
मोर्चाची सुरुवात पटेल चौकातून करण्यात आली होती हा मोर्चा सारडा यांच्या निषेधाच्या घोषणा देत वखारभाग मधील त्यांच्या बंगल्यासमोर आला आसता आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली
यावेळी महेश जगताप, संदीप शीरोटे, रितेश साळोखे, शशिकांत जाधव, राहुल साबळे, रमेश भोसले, रवींद्र बोराटे, विजय धनवडे, जयवंत त्यानंतर मटकर आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली