श्रीलंका आर्थिक संकट: श्रीलंकेतील वाढत्या आर्थिक संकटानंतर, परिस्थिती बिघडली ,

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

श्रीलंका आर्थिक संकट: श्रीलंकेतील वाढत्या आर्थिक संकटानंतर, परिस्थिती बिघडली ,       निदर्शकांकडून शासकीय निवासस्थानाचा ताबा

कोलंबो : आर्थिक दिवाळखोरीत गेलेल्या श्रीलंकेत शनिवारी हजारो निदर्शकांनी राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची पूर्वकल्पना मिळाल्याने


 राजपक्षे यांनी शुक्रवारीच पलायन केले. पण, त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.

संतप्त निदर्शक व सुरक्षा दलामध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत दोन पोलिसांसह ३० जण जखमी झाले. हजारो निदर्शक आपल्या हातात श्रीलंकेचे राष्ट्रध्वज घेऊन रस्त्यांवर उतरले होते. 


त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाभोवती असलेली बॅरिकेड तोडून इमारतीचा ताबा घेतला. या उग्र राजपक्षेच्या राजीनाम्याची निदर्शनांमध्ये श्रीलंकेचे काही खासदारांकडून मागणी सैनिकही सामील झाले होते.


राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मार्च महिन्यापासून होत आहे. मात्र ती मागणी राजपक्षे यांनी मान्य केली नव्हती. (वृत्तसंस्था)

राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्याच पक्षाच्या १६ खासदारांनी त्यांना पत्र लिहून केली आहे. त्याबाबत राजपक्षे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.


राष्ट्राध्यक्षांच्या स्विमिंग पूलमध्ये आंदोलकांच्या उड्या आंदोलक राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात घुसले. तर काही आंदोलकांनी विरोधासाठी थेट राष्ट्राध्यक्ष भवनाच्या आतील स्विमिंग पूलमध्येही उड्या मारल्या. राष्ट्राध्यक्षांच्या जलतरण तलावात अनेक आंदोलकांनी पोहायला सुरुवात केली. सोशल मीडियात या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. स्विमिंग पुलाभोवती मोठ्या संख्येने आंदोलक दिसत आहेत. अनेकांच्या हातात श्रीलंकेचा राष्ट्रध्वज असून घोषणाबाजी करीत अनेकांनी पूलमध्ये उड्या मारल्या.

श्रीलंका आर्थिक संकट: 

श्रीलंकेतील वाढत्या आर्थिक संकटानंतर, परिस्थिती बिघडली , 

श्रीलंकेतील वाढत्या आर्थिक संकटानंतर परिस्थिती सातत्याने अनियंत्रित होत आहे. आर्थिक संकटात वाढ झाल्यानंतर देशातील राजकीय संकट ही गडद झाले आहे.  देशातील परिस्थिती अनियंत्रित झाल्याने लोक रस्त्यावर उतरले . आता लष्कराला कमांड ताब्यात घ्यायची आहे आणि त्यांनी आंदोलकांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हीही श्रीलंकेत दररोज होत असलेली निदर्शने आणि तिथली बिघडलेली परिस्थिती यांची छायाचित्रे पाहत असाल, पण या परिस्थितीचे कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का.

जर तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचे असेल की, श्रीलंकेत आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि कोणत्या कारणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे त्याची कारणे काय आहेत. यानंतर तुम्हाला समजेल की श्रीलंकेत हे संकट का निर्माण झाले आहे आणि यासाठी सरकारची कोणती धोरण जबाबदार आहेत...

श्रीलंकेच्या संकटामागे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे आज देशातील परिस्थिती अनियंत्रित झाली आहे..

सोप्या भाषेत समजून घ्या... आज श्रीलंकेतील परिस्थितीची पाच कारणे काय आहेत ते...


  परकीय कर्ज सातत्याने वाढत आहे

श्रीलंकेला 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर हे सर्वात मोठे आर्थिक संकट मानले जाते. आता येथे महागाईही गगनाला भिडत आहे. यामागची कारणे सांगितली तर पहिले कारण म्हणजे श्रीलंकेवरील चीनसारख्या देशांचे बाह्य कर्ज. बीबीसीच्या एका अहवालानुसार, समीक्षकांचे असे मत आहे की, अत्यावश्यक नसलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे कर्जात लक्षणीय वाढ झाली आहे. श्रीलंकेवर सध्या ५१ अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.


   कमी परकीय चलन साठा

यासोबतच परकीय चलनाचा साठाही सातत्याने कमी होत आहे. मार्चमध्ये श्रीलंकेचा परकीय चलन साठा 16.1 < टक्क्यांनी घसरून $1.93 अब्ज झाला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात असे दिसून आले आहे की या वर्षी श्रीलंकेच्या कर्जाच्या पेमेंटमध्ये अंदाजे $8.6 बिलियनने घट झाली आहे.

   कोरोना महामारी

श्रीलंकेतील या परिस्थितीमागे कोरोना विषाणूचा महामारीही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, कोरोना महामारीच्या काळात ट्रॅव्हल इंडस्ट्रीला मोठा फटका बसला होता आणि श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत कोरोना महामारीचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत ते पाहणे फार कठीण झाले आहे. गेल्या वर्षभरात या क्षेत्राला मोठा फटका बसला असून त्यामुळे परकीय चलनातही लक्षणीय घट झाली आहे.    आर्थिक गैरव्यवस्थापन

महामारी आणि चीनचे कर्ज याशिवाय काही अंतर्गत बाबी यासाठी कारणीभूत आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार,  राजपक्षे यांनी कराच्या संदर्भात अनेक घोषणा केल्या होत्या. त्यांनी करात कमालीची कपात केली होती आणि त्यामुळे सरकारकडे चलनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. अनेक टीकाकार सरकारच्या या निर्णयाला अत्यंत चुकीचे मानतात आणि आजच्या परिस्थितीसाठी या निर्णयाला जबाबदार धरतात.

   आयात बंदी

याशिवाय देशातील अनेक वस्तूंच्या आयातीवर सरकारने बंदी घातली. त्यात रासायनिक अन्नाचाही समावेश आहे, ज्याचा पिकांवर मोठा परिणाम झाला. परिणामी खाद्यपदार्थही बाहेरून मागवावे लागले. त्यामुळे महागाई खूप वाढली आणि समस्या बिकट झाली.

____________________________________________

           श्रीलंका जात्यात तर भारत सुपात....


आता प्रश्न असा उपस्थित होतो की, भारतामध्ये ही परिस्थिती निर्माण होऊ शकते का? तर नक्कीच निर्माण होऊ शकते. याचे कारण असे की ,भारतातील सध्याचे सरकार सुद्धा गेल्या ८ वर्षांपासून हिंदू राष्ट्रवादाच्या सिद्धांतावर चाललेले आहे. मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाचा द्वेष करायचा आणि एक अखंड भारत निर्माण करायचा, असे स्वप्न घेऊन सध्याचे सरकार चालले आहे. श्रीलंकेच्या सरकारप्रमाणेच गंभीर आर्थिक चुका करत आहे. चुकीच्या पद्धतीने अमलात आणलेली नोटबंदी आणि कुठलीही तयारी नसताना लागू केलेला जी एस टी .ही दोन ठळक उदाहरणे आहेतच, कारण त्यामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. शिवाय कोविड महामारी हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती आटोक्यात ठेवण्यात आलेले अपयश, रोजगार निर्मिती करण्यात आलेले अपयश, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात आलेले अपयश. सरकारच्या अपयशांची ही यादी हनुमानाच्या शेपटाप्रमाणे लांबतच चालली आहे. यात सर्वात गंभीर बाब ही आहे की, या बाबतीत ना प्रधानमंत्री कधी बोलतात ना त्यांचे मंत्री व सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे लोक बोलतात. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची ही शोकांतिका आहे. त्यामुळे श्रीलंकेवर जे आर्थिक संकट आलेले आहे ते भारतात येणारच नाही या भ्रमात कुणी राहू नये. श्रीलंका आज जात्यात भरडला जातोय तर भारत सध्या सुपात आहे, हे वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे. सुपातून भरडण्यासाठी जात्यात जाण्याची वेळ भारतावर येवू नये यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची सुबुद्धी परमेश्वर भारत सरकारला देवो, एवढीच प्रार्थना!

(संदर्भ- हा लेख लिहिण्यासाठी लंडन विद्यापीठाच्या प्राध्यापक मधुरा रासरत्नम व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे आर रामकुमार यांच्या लेखांचा उपयोग केला आहे.)

सोपान पांढरीपांडे

(लेखक हे जेष्ठ पत्रकार असून रामनाथ गोयन्का राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार विजेते आहेत.) 9850304005

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई