मोटार सायकल चोरांचा महाप्रताप.. शिकारी खुद यहाँ शिकार हो गया...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मोटार सायकल चोरांचा महाप्रताप.. शिकारी खुद यहाँ शिकार हो गया...

मोटार सायकल चोरांचा महाप्रताप.. शिकारी खुद यहाँ शिकार हो गया...


SANGLI
लोकसंदेश न्यूज आटपाटी प्रतिनिधी

ज्याची गाडी चोरली.. त्याच्याच गावात पाहुण्याकडे गेले व अलगद सापडले

 आटपाडी तालुक्यातील एक मोटर सायकल गाड़ी चोरीस गेली होती.. मालकाने गाडीचा शोध घेतला परंतु गाडी काही मिळाली नाही.. परंतू मालकाचे दैव बल्लत्तर... आणि
 चोरट्यांनी ज्या व्यक्तीची गाडी चोरली होती, त्याच व्यक्तीच्या गावातील आपल्या पाहुण्यांकडे हे चोरटे तीच चोरीची गाडी पंधरा दिवसांनी घेऊन गेले. 

गावातील चाणाक्ष नागरिकांनी
ओळखल्यानंतर पोलिसांनी या चोराच्या मुसक्या आवळल्या. आपण जात असलेल्या पाहुण्यांच्या गावातीलच दुचाकी असल्याची कसली ही कल्पना दोघा चोरट्यांना नसल्याने ज्या गावातील गाडी चोरली त्याच गावात ते गाडी घेऊन गेल्याने व पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने

 'शिकारी खुद यहाँ शिकार हो गया' अशी चर्चा रंगली.

पंधरा दिवसांपूर्वी बाबासाहेब गणपत काटे ( रा. पिंपरी खुर्द) हे सेवानिवृत्त जवान काही कामानिमित्त दुचाकी (क्र. एमएच १०, यु ६५६२) वरून आटपाडी बसस्थानकात आले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याबाबत त्यांनी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद केला होता.

 पण गाडी चोरीचा छडा लागला नव्हता मात्र ज्या चोरट्यांनी ही दुचाकी चोरली होती त्याच दुचाकीवरून आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द गावात पाहुण्यांकडे गेले


पंधरा दिवसांपूर्वी आपण आटपाडी बस स्थानकातून चोरलेली दुचाकी ही याच गावातील व्यक्तीची आहे हे त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे चोरटे गावात येताच काही नागरिकांनी ती गाडी पाहिली, या गाडीवर विशिष्ट रंगाने काही मजकुर व चित्र काढले असल्याने गाडी लगेच ओळखली जात होती. गावातील काही लोकांनी जवान काटे यांना गाडी गावात आल्याचे सांगितले. त्यानंतर जवान काटे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी चोरट्यांकडे गाडी कोणाचीआहे. अशी विचारणा केल्यानंतर ते व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत.

त्यातील एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर एक दुसऱ्या साथीदाराला याची काहीच कल्पना नसल्याने तो नागरिकांच्या तावडीत अलगद सापडला. जमलेल्या नागरिकांनी आटपाडी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यावेळी पिंपरी खुर्द येथे पोलिसांनी धाव घेत डाळिंब बागेत लपून बसलेल्या चोरास पकडले.

 चौकशीत दुचाकी चोरणारे बिरा अर्जुन मोरे (वय 30), गणेश किसन मोरे (वय 30) दोघेही रा. सोनलवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील रहिवासी असल्याचे समजले. चोरांनी गुन्ह्य कबूल केला असून 
दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे  .. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस कॉन्स्टेबल पुकळे, पोलीस नाईक दिग्विजय कराळे, नितीन मोरे, प्रमोद रोडे, संभाजी सोनवणे हे अधीक तपास करित आहेत,

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली