मुलींच्या संरक्षणासाठी निर्भया पथकाची स्थापना... हातकलंगले निर्भया पथक प्रमुख स्मिता बडे यांचे उद्गार...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुलींच्या संरक्षणासाठी निर्भया पथकाची स्थापना... हातकलंगले निर्भया पथक प्रमुख स्मिता बडे यांचे उद्गार...

मुलींच्या संरक्षणासाठी निर्भया पथकाची स्थापना हातकलंगले निर्भया पथक प्रमुख स्मिता बडे यांचे उद्गार..


KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर;विनोद शिंगे

            सध्याच्या बदलत्या युगात मुलींच्या विकासासाठी तेचच त्यांच्या संरक्षणासाठी शासनाने निर्भया पथकाची स्थापना केली असून, मुलींनी निर्भया पथकाच्या माध्यमातून स्वतःवर होणारे अन्याय, मुलांची छेडछाड ,कॉलेज जीवनात होणारा त्रास, मोबाईलवर होणारा त्रास या पासून निभया पथकाच्या माध्यमातून मुलींचे संरक्षण करण्यात येणार आहे त्यासाठी मुलींनी कोणत्याही अडचणी प्रसंगी निर्भया पथकाला पाचरण करावे असे उद्गार  हातकणगले तालुका निर्भया पथकाच्या प्रमुख स्मिता बडे यांनी काढले 

          त्या कुंभोज तालुका हातकलंगले येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संचलित न्यू इंग्लिश स्कूल व गर्ल हायस्कूल कुंभोज येथे  निर्भया पथक मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी हातकणगले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत उपरडे हे होते.


       यावेळी मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे कायदे व शासनाने लागू केलेल्या नियम कॉलेज जीवनात असताना काही त्रास झाल्यास त्यासाठी उपाय योजना व कायद्याचा मार्गदर्शन आदी विषयावरती स्मिता बडे यांनी मार्गदर्शन केले. मुलींना स्वतःचे संरक्षण स्वतः करता आले पाहिजे यासाठी लागेल ते प्रयत्न करा असाही मौलिक सल्ला त्यांनी दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक एम एस पीरजादे यांच्या हस्ते करण्यात आला


             यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पोलीस उपनिरीक्षक यशवंत उपरडे म्हणाले की, निर्भया पथक व कायदा व सुव्यवस्था हे तुमच्या सर्वांच्या संरक्षणासाठी आहे त्याचा योग्य वेळी व योग्य ठिकाणी वापर करून स्वतःचे व समाजाचे संरक्षण करा. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश घोरपडे, पत्रकार विनोद शिंगे, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
 यावेळी शालेय समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग भानुसे, शालेय समितीचे सर्व सदस्य शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.  

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई