पत्रकारास धमकी देणाऱ्या वादग्रस्त नायब तहसीलदार गौरकार वर कारवाई करा. जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांचे निवेदन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पत्रकारास धमकी देणाऱ्या वादग्रस्त नायब तहसीलदार गौरकार वर कारवाई करा. जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांचे निवेदन

वादग्रस्त नायब तहसीलदार गौरकार वर कारवाई करा.
जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांचे निवेदन


विशाल मासूरकर
लोकसंदेश न्यूज यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ ; पत्रकरास धमकी देणारे येथील वादग्रस्त नायब तहसीलदार अजय गौरकार यांचेवर कारवाई करावीअशी मागणी....
यवतमाळ जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेकडून आज गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.


यवतमाळ तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अजय गौरकार यांनी काल मंगळवारी १२.३२ वाजता ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती वृत्तपत्राचे प्रतिनिधी ओंकार चेके यांना भ्रमणध्वनीवरून धमकी दिली. या घटनेमुळे पत्रकार सृष्टीत संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. 


सध्या शालेय व महाविद्यालयीन प्रवेशाची घाई सुरू असल्याने अनेक पाल्य व पालक प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर दाखले मिळविण्यासाठी तहसील कार्यालयाकडे धाव घेतात. या पाल्यांना असे दाखले वेळेवर न मिळाल्यास त्यांचा प्रवेशाचा मार्ग रोखल्या जातो व अनेकांना त्याचा मनस्तापही सहन करावा लागतो. स्थानिक तहसील कार्यालयात पाल्यांसाठी आवश्यक असलेले दाखले वेळेत मिळत नाही, अशी अनेक पालकांची ओरड सुरू आहे.या संदर्भात पत्रकार ओंकार चेके यांनी काही वृत्तपत्रांमध्ये ‘तहसील कार्यालयातील मनमानी कारभारामुळे पालक व विद्यार्थी त्रस्तअशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त वाचल्यानंतर सदर कार्यालयातील नायब तहसीलदार अजय गौरकार यांनी त्यांच्या ९२८४०६८९६३ या क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरून चेके यांच्याशी मंगळवार दिनांक 12/7/2022 रोजी १२.३१ वाजता संपर्क साधला. यावेळी नायब तहसीलदाराने सदर ज्येष्ठ पत्रकाराला एकेरी शब्दात बोलतांनाच त्यांना अप्रत्यक्षपणे जिवे मारण्याची धमकी दिली. तु आत्ताच तहसील कार्यालयात ये,तुला मी सोडणार नाही, अशा पध्दतीची त्यांनी चेके यांना  १.४ सेंंकदाच्या संभाषणातून अनेकदा धमकी दिली. गौरकार हे पाल्य व पालकांशी अंत्यत उध्दटपणे वागतात. दाखल्यासाठी विचारपुस करण्यास आलेल्या पाल्यांसोबत त्यांची वागणूक अंत्यत उर्मटपणाची आहे, अशा अनेक तक्रारी आहेत. गत कोरोना काळात दिग्रस येथील एक मिलिटरी सैनिकांला प्रवास पास साठी याच गौरकार ने 1500 रुपये लाच मागितली अशी तक्रार समोर आल्यानंतर UCN केबल नेटवर्क ने तशी बातमी दिली होती तेव्हा ही याच गौरकारनी  UCN
प्रतिनिधी निनावे यांना जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामकाजात अडथळाची खोटी तक्रार देवून फसविण्याची धमकी दिली होती.

महाराष्ट्रातील सर्व संबंधित तहसीलदारांना निवेदन करण्यात येते की, शाळेचे निकाल लागलेले आहेत.. शाळेमध्ये लागणारे दाखले हे सर्व शाळा,कॉलेज, आय.टी.आय,असो, वेळेतच मागतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व संबंधित सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक नवीन पालूपद लावून ठेवलेल असते "सर्वर डाऊन आहे" परंतु जिल्हाधिकारी असो, तहसीलदार असो,नाही तर क्लार्क असो, यांची देखील मुले शाळेत जात असतात... त्यांना सुद्धा ही दाखले लागत असतात... गोरगरिबांची कामे करण्यासाठी आपल्याला नेमलेले आहे . आणि ती प्रामाणिकपणे करावीत अशी सर्वसाधारण जनतेची इच्छा असते,  सर्वच कामात कमाई दिरंगाई नसावी.. ...का तर हा गोरगरिबांच्या विद्यार्थ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे... गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गाचा प्रश्न आहे . त्याच्यासाठी जे आवश्यक दाखले  या विद्यार्थ्यांना  लागणार आहे आहेत ते त्वरित व तातडीने देण्याचे आदेश महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना द्यावेत असे आम्हाला वाटते ...
संपादक ; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई

हा सर्व प्रकार पाहता सदर नायब तहसीलदार हा आपल्या पदाचा दुरुपयोग करतात हे स्पष्ट दिसून येते त्यांच्या विरुद्ध इतर ही अंत्यत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत. गौरकार हे महसूल प्रशासनात एक वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची ही पुर्वपिठीका लक्षात घेता पत्रकार चेके यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. या संपुर्ण प्रकारणाची महसूल प्रशासनाने वरीष्ठ स्तरावरून चौकशी करून अशा वादग्रस्त अधिकार्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा याप्रकरणी महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघ आंदोलन छेडतील, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू .असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे. 
सदर निवेदन देताना,नागेश गोरख,उल्हास निनावे, ओंकार चेके,पवन धोत्रे,संतोष डोमाळे, जीवन बोरकर,सचिन चौधरी,अरविंद आडे, दत्तु कुशावार,भीमराव खोब्रागडे,सुरेश दीक्षित
आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई