RAYGAD
लोकसंदेश प्रतिनिधी श्याम लोखंडे,रायगड
रोहा देवकान्हे येथे यांत्रिकी पद्धतीने शेतामध्ये भात लागवड ... रोहा तालुका कृषी अधिकारी व शेतकऱ्यांंचा स्तुत्य उपक्रम
रायगड रोहा तालुक्यातील मौजे देवकान्हे येथे अत्याधुनिक यांत्रिकी साहाय्याने शेतामध्ये भात लागवड करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी रोहा यांच्या अंतर्गत मौजे देवकान्हे येथील कृषिनिष्ठ व प्रगतशील शेतकरी नथुराम भोईर यांच्या शेतावर नवे उपक्रम म्हणून यंत्राच्या साह्याने भात लागवड करण्यात आली.
आता जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहे शेतामध्ये काम करणारी मजुरांची संख्या हळूहळू कमी होत आहे,आजमीती शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही... त्यासाठी आधुनिक यंत्रांची निर्मिती झालेली आहे या यंत्र तंत्रज्ञानाने जर आपण भाताची लागवड केली तर या मधून शेतकऱ्याची नक्कीच वेळेची व पैशाची बचत होणार असल्याचे मत सौ .सारिका दिघे सामंत सहाय्यक कृषी अधिकारी यांनी व्यक्त केले आहे.
त्यापुढे म्हणाल्या ...
बदलत्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा व यंत्राद्वारे शेतात भात लागवड केल्याने वेळेची व खर्चाची बचत होतेच परंतू पुढील काळात खरीपातच नव्हे तर रब्बी हंगामात देखील जास्तीत जास्त या यंत्राचा वापर आपल्या भागात करून सर्व शेती लागवडीखाली आणुयात असे आवाहन सौ. सारिका दिघे सावंत यांनी या वेळी केले.
सदरच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन व नियोजन विभागीय कृषी सहाय्यक अधिकारी सौ सारिका दिनेश दिघे सावंत यांनी केले होते प्रसंगी यावेळी तालुका कृषी अधिकारी रोहा कार्यालयातील कृषी अधिकारी डी बी साले, सहाय्यक कृषी अधिकारी पी एस राक्षीकर, श्रीमती विद्या चव्हाण,श्रीमती कविता दोरुगडे, या उपस्थित होत्या.तसेच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालयदापोली चे कृषिदूत विद्यार्थी, देवकान्हे धानकान्हे येथील शेतकरी अविनाश कान्हेकर, पांडुरंग गोसावी, धोंडू कचरे, विश्वनाथ भोईर, सुनील बाईत,व स्वतः शेतकरी प्रसाद भोईर व या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली