सांगली सिटी सर्व्हे कार्यालयात मनमानी कारभार.... सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लगत असणारे आणि त्यांच्या अधिपत्याखाली चाललेले सिटी सर्वे ऑफिसचा गोंधळ कारभार.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली सिटी सर्व्हे कार्यालयात मनमानी कारभार.... सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लगत असणारे आणि त्यांच्या अधिपत्याखाली चाललेले सिटी सर्वे ऑफिसचा गोंधळ कारभार.....SANGLI
लोकसंदेश सांगली प्रतिनिधी ,

सांगली येथील सिटी सर्व्हे कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु. नागरिकांची कामे वेळेत केली जात नाहीत. किरकोळ त्रुटी काढून नागरिकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडले जाते. या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करु, असा इशारा कॉंग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक मासाळे यांनी दिला आहे.


याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही मासाळे यांनी सांगितले. मासाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली ते म्हणाले, की
सिटी सर्व्हेचे कार्यालय
अनागोंदी कारभाराचे आगार बनले आहे. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यामध्ये शिस्त नाही. नागरिकांशी कसे वागावे याचे भान अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहिलेले नाही. कोणतेही काम शासकिय सनदेप्रमाणे केले जात नाही. किरकोळ त्रुटी काढून नागरिकांना वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडले जाते. कार्यालयातील अधिकारी उपस्थित नसतात. काही वेळा शिपाईच अधिकारी असल्यासारखे वागत आहेत असेही त्यानी सांगीतले


यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या कार्यालयामध्ये सिसिटीव्ही कॅमेरे बसवावेत. फायर ऑडिट करावे. संगणक यंत्रणा अद्ययावत करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आठ दिवसांत कारभार न सुधारल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा मासाळे यांनी दिला आहे

सिटी सर्व्हे कार्यालयात मनमानी कारभार

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लगत असणारे आणि त्यांच्या अधिपत्याखाली चाललेले सिटी सर्वे ऑफिसचा गोंधळ कारभार.....

नागरिकांना मनस्ताप... वरिष्ठ अधिकार्यांची मंत्री असल्यासारखी गोरगरिब नागरीकांना वागणूक....
महाराष्ट्रात भ्रष्टाचारातील नंबर एक मानले गेलेलं महसूल खाते ...


खाते काय काय खाते हे सर्व जग जाहीर आहे....

वरीष्ठ अधिकारी "जाधव" नामक यांच्या अधिपत्याखाली सांगलीमध्ये या खात्याची तीन ऑफिसेस आहेत, एक  जिल्हाधिकारी कार्यालयात व दोन ऑफिस राजवाडा परिसरामध्ये आहेत


सर्वसाधारण जमिनीचे संबधित कामे जमिनीची, नकाशे जमिनीची मोजणी जमिनी, जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड इत्यादी, संदर्भात हा विभाग काम करत असल्यामुळे येथे पैशाचा पाऊसच आहे....

येथे एखाद्या गरिबाने सातबारा देखील मागितला तरी त्याच्याकडून शंभर ते दोनशे रुपये वसूल करण्यासाठी एक एजंटाची टोळीच कार्यरत आहे ...
हे सर्व या वरिष्ठ अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत आणि नागरिकांना पण माहित आहे....

नागरिकांना कोणतीही प्रकारची चांगली वागणूक या महसूलखात्या कडून मिळत नाही. या मध्ये भरीसभर म्हणून यातील महिला अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत आम्ही राजे असल्याचा आविर्भाव  आणून येथे काम करत असतात

मग तो कोणी असो ही सांगलीकरांची ही व्यथा आहे ...

एखाद्याचे शूल्लक जरी काम असेल जसे ,आधार फोड नकाशा, जूने मोजणी नकाशे, एखादा कागद असेल तर ... त्याच्यासाठी राजवाड्यामध्ये सूर्यवंशी मॅडम यांच्या अधिपत्याखाली चाललेले ऑफिसमध्ये खाली अक्षरशः लोकांचे जमात जमिनीचे नकाशे घरांचे नकाशे व इतर व सर्व कागद रद्दी पेपर टाकल्यासारखे येथे पेपर टाकून त्याच्यामध्ये एक जुना माणूस हे सर्व शोधत असतो ... सर्व नकाशे, जुने सर्व कागद फाटून गेलेले आहेत ,परंतु या अधिकाऱ्यांच् लक्ष याच्या कडे नाही फक्त हे अधिकारी एखाद  काम असेल आणि ते एजंटकडून आले असेलच तरच ते करतात . .अन्यथा या खात्यामधे सर्व साधारण नागरिकाचे कोणतेही काम होत नाही... त्यामुळे सांगलीतील नागरिक भयानक त्रस्त आहेत ...आता सर्व संघटनाच्या माध्यमातून एकत्र येऊन याच्या विरोधात एक जन आंदोलन घेण्याच्या तयारीत नागरिक व संघटना आहेतनवनिर्वाचित जिल्हाधिकारी साहेब डॉ. मंतांडा राजा यांना नम्रपणे कळवतो की, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यापासून शिपायांचे एक कार्यशाळा घेऊन त्यांना नागरिकांशी कसं बोलावं याचा धडा द्यावा... व नागरिकांचे लवकरात लवकर काम निपटारा करण्यासाठी आदेश द्यावेत. .. कृपया याच्यामध्ये लक्ष देऊन सांगलीकरांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे....

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली