SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सांगली
व्हॅटची अभय योजना आकर्षक... उद्योजक , व्यापारी यांनी फायदा घ्यावा... खासदार संजय काका पाटील
राज्य जी.एस टी . विभागामार्फत सध्या राबवण्यात येणारी व्हॅटची अभय योजना उद्योजक , व्यापारी यांचे साठी लाभदायक असून त्यांनी सदर योजनेचा फायदा घ्यावा असे प्रतिपादन खासदार संजय काका पाटील यांनी केले.
ते राज्य जी.एस टी.च्या चिंतामणी नगर येथील कार्यालयास सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते.
खासदार पाटील यांनी राज्य जी.एस.टी. विभागाने या योजनेचे फायदे जास्तीत जास्त करदात्यांपर्यंत पोहोचतील या साठी प्रयत्न करावेत असे सांगितले
यावेळी उपायुक्त सचिन जोशी यांनी अभय योजनेची माहिती व त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर कर दाते घेत आहेत हे सांगितले. जुनी थकबाकी संपुष्टात आणण्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक आकर्षक योजना ३० सप्टेबर २२ पर्यंत सुरू आहे असे ही त्यांनी सांगितले.
उपायुक्त सुनील कानगुडे यांनी सांगली जिल्ह्यात राज्य जीएसटी व केंद्रीय जीएसटी या दोन्ही विभागात समन्वय उत्तम असून उद्योजक व्यापारी यांचे सहकार्याने महसूल वाढ चांगली आहे असे सांगितले .
यावेळेस उपायुक्त (प्रशासन), राज्य जी एस टी, सांगली सचिन जोशी, उपायुक्त,सुनील कानगुडे, उपायुक्त कवींद्र खोत, केंद्रीय जी.एस टी चे वरिष्ठ निरिक्षक राजेंद्र मेढेकर , कर अधिकारी शैलेंद्र पेंडे, श्रीकांत कुंभार,तसेच निरीक्षक शिवराज भोइटे व उद्योजक अभय जैन आदी सह व्यापारी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली