RATGAD सावधान !!!! पोलादपूर पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चरई वडाचाकोंड वरील डोंगराला भेगा पडल्याची धक्कादायक माहिती समोर ....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

RATGAD सावधान !!!! पोलादपूर पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चरई वडाचाकोंड वरील डोंगराला भेगा पडल्याची धक्कादायक माहिती समोर ....
RATGAD पोलादपूर
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी शाम लोखंडे

चरई वडाचाकोंड वरील डोंगराला भेगा, भूस्खलनाचा धोका; प्रशासनाचे केली घटनास्थळाची पाहणी...
स्थलांतरित होण्याच्या ग्रामस्थांना सूचना ...


रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात गेल्या वर्षी २२ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे महाड तालुक्यातील तळिये येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन ८७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर पोलादपूर तालुक्यातील केवनाले व साखर सुतारवाडी येथे झालेल्या भूस्खलनात ११ निष्पाप जीवांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.


या घटनेला १ वर्ष पूर्ण झाले असून या घटनांच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या असतानाच पोलादपूर पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चरई वडाचाकोंड वरील डोंगराला भेगा पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्ञानेश्वरवाडीतील शेतकरी
सतीश बांदल हे शनिवारी सकाळी आपल्या बकर्यांना व गुरांना चरण्यासाठी डोंगरावर घेऊन गेले असता त्यांच्या ही बाब निदर्शनात आल्याने तात्काळ त्यांनी हि बाब चरई ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांना कळवली असता चरई ग्रामपंचायत उपसरपंच सुशांत कदम याने सदरील घटनेची माहिती तहसील कार्यालय पोलादपूर यांना फोनद्वारे कळवली.घटनेची माहिती मिळताच महाडच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलादपूरच्या तहसीलदार दीप्ती देसाई, तलाठी सुनील वैराळे यांनी एन डी आर एफ च्या जवानासह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असता सदरील ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले.
घटनास्थळी आलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ चरई वडाचाकोंड येथील ज्ञानेश्वरवाडी व हनुमानवाडी ग्रामस्थांशी चर्चा करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत.


याशिवाय भुस्खलनाचा धोका असलेल्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करीत असताना प्रशासन सर्व व्यवस्था करीत असल्याने, आपण देखील स्थलांतर करावे, अन्य व्यवस्था प्रशासनातर्फे केली जाईल असे यावेळी ग्रामस्थांशी बोलताना प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली