सातारा : शिंदे-फडणवीस सरकारच्यामंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला, तरी देखील खातेवाटप झालेले नाही. नव्या सरकारचे खाते वाटप येत्या तीन दिवसात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा : शिंदे-फडणवीस सरकारच्यामंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला, तरी देखील खातेवाटप झालेले नाही. नव्या सरकारचे खाते वाटप येत्या तीन दिवसात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
SATARA
लोकसंदेश प्रतिनिधी सातारा

सातारा : शिंदे-फडणवीस सरकारच्यामंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला, तरी देखील खातेवाटप झालेले नाही. नव्या सरकारचे खाते वाटप येत्या तीन दिवसात, मुख्यमंत्री: एकनाथ शिंदे

शिंदे-फडणवीस सरकारच्यामंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला, तरी देखील खातेवाटप झालेले नाही. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावर साताऱ्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. येत्या १५ ऑगस्टपूर्वी म्हणजेच येत्या ३ दिवसांत खातेवाटप होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच आमचे सरकार हे डबल इंजिन सरकार असून आम्ही डबल स्पीडने काम करून असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वर जवळील आपल्या दरे गावी पोचल्यानंतर म्हणाले की, माझी कर्मभूमी मुंबई असली तरी माझी ही जन्मभूमी आहे. त्यामुळे आपल्या लोकांनी केलेलं स्वागत हे आनंदायीच असतं.
 हे सरकार शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी हे सरकार पुढं नेत आहोत. मात्र लोकांच्या अपेक्षा या ठिकाणी वाढलेल्या पहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. पुनर्वसनाचे सगळे प्रश्न लवकरच सोडवले जातील. युद्धपातळीवर आम्ही ते सोडवू. तसंच आमचं डबल इंजीन सरकार आहे, यामुळे आम्ही डबल स्पीडने काम करू. 

पर्यटनाच्या दृष्टीने साताऱ्याचा पश्चिम भाग महत्वाचा आहे. तसेच या भागाच्या विकासाच्या दृष्टीने सुद्धा विचार सुरू असून लवकरच या बाबतीत निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पर्यटनाला साताऱ्या चांगला वाव आहे. या बाबतीत सुद्धा खूप काम करण्यासारखं आहे. या दृष्ठीने सरकार या सर्वाबाबतीत योग्य यो निर्णय घेऊन काम करेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर मनात घेतलं तर.. निसर्गरम्य कोकणाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही ...कारण सोळशी नदीपासून कोयना धरणाच्या पर्यंत 80 किलोमीटर दोन्ही बाजू अंतराचा आपल्याला बॅक वॉटर आहे ... या दोन्ही बाजूस शासनाची इच्छा असेल तर गोव्यासारखे पर्यटक आपल्याकडे सुद्धा येतील असा निसर्गाने भरून राहिलेला हा भाग आहे ,त्याच्या आजूबाजूस न्यू महाबळेश्वर योजना भूषण गगरांनी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मागे आणली गेली होती ,परंतु हा प्रकल्प यशस्वी झाला नाही परंतु आज सातारा व आजूबाजूच्या लोकांच्या अशा पल्लवीत झालेल्या आहे की, , आमच्या भागाचे मुख्यमंत्री झालेले आहेत तर या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन आमच्या कोकणवासीयांना एक चांगल्या रोजगाराची संधी मिळेल व आम्हास रोजगार कामासाठी मुंबईत जावे लागणार नाही..... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आपणास ही संधी मिळेल अशी आशा या सोळशी खोऱ्यातील जनता करीत आहे...
सलीम नदाफ ,
संपादक: लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ,मुंबई.