SANGLI : सांगलीच्या उत्कर्षाचा मार्ग असलेला शंभर फुटी रोड अर्थात राजर्षी शाहू मार्गासाठी 'रास्ता रोको'.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : सांगलीच्या उत्कर्षाचा मार्ग असलेला शंभर फुटी रोड अर्थात राजर्षी शाहू मार्गासाठी 'रास्ता रोको'.....
SANGLI
सांगलीच्या उत्कर्षाचा मार्ग असलेला शंभर फुटी रोड अर्थात राजर्षी शाहू मार्गासाठी 'रास्ता रोको'.....

सांगली शहरातील राजर्षी शाहू मार्गाच्या (शंभर फुटी रस्ता) प्रकल्प आराखड्याला महासभेत मंजुरी द्यावी, अशी मागणी करीत शुक्रवारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी रस्ते कामाला मंजुरी देण्याची ग्वाही आंदोलकांना दिली.


माजी आयुक्त नितीन कापडणीस त्यांनी शंभरफुटी रस्ता विकासासाठी ७६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धर्तीवर या रस्त्याचा विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प आराखडा
मंजुरीसाठी महासभेकडे पाठविला होता; पण महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महासभेच्या अजेंड्यातून हा विषय वगळला. विरोधी पक्षनेते संजय मेंढे व राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांनी विरोध केल्याने सूर्यवंशी यांनी
अजेंड्यावरून हा विषय वगळला होता.


या प्रकाराने संतप्त झालेल्या काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत भोसले, फिरोज पठाण यांनी आंदोलनाची घोषणा केली शुक्रवारी शंभर फुटी रस्त्यावरील एम.एस.ई.बी. कार्यालय समोर तासभर रस्ता रोको करण्यात आला त्यामुळे रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांगा लागून राहिल्या होत्या


या भागातील नगरसेवक अभिजीत भोसले म्हणाले की, हा रस्ता पाच प्रभाग जोडतो तसेच शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे या कामातकोणीही अडकाठी आणू नये, राजश्री शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या नावावर असलेला रस्त्याचा विकास करून त्यांना अभिवादन करावे अशी मागणी त्यांनी केली,


यावेळी या भागाचे काँग्रेसचे नगरसेवक फिरोज पठाण म्हणाले की, सांगलीतील एक प्रमुख रस्ता असलेल्या या रस्त्याची दुर्दशा गेली पंधरा वर्षे अशीच चालू आहे, आता त्यास मंजुरी मिळत असताना प्रशासनाने कोणते ही राजकारण न करता त्वरित हा प्रश्न मार्गी लावून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा..


आंदोलनात नगरसेवक मंगेश चव्हाण आरती वळवडे, पवित्रा केरीपाळे, स्नेहल सावंत ,महेंद्र सावंत, युनूस महात, करीम मेस्त्री, रजाक नाईक व या भागातील सर्व नागरिकांनी भाग घेतला होता...
_______________________________________________________

शंभरफुटी रोड,प्रशासन आणि पुड्या....
सांगली महानगरपालिका झाल्यापासून सांगलीच्या प्रगतीचा असणारा हा शंभर फुटी रोड ...गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून चर्चेत आहे.... सांगलीचे लोकप्रतिनिधी,आमदार,खासदार व अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याच दिसून येत आहे. गेली पंधरा वर्षे या परिसरातील नागरिक अक्षरशः  जीव मुठीत धरून या रस्त्यात वरून जात येत असतात.... 1992 पासून या रस्त्यासाठी सातत्याने या भागातील नागरिक आंदोलने करीत आहेत... परंतु महापालिका प्रशासन ढीम्म प्रकारे या प्रश्नाकडे लक्ष देत आहे.....1992 च्या दरम्यान भोपे गटार झाली त्यावेळी मी या 100 फुटी रस्त्यासाठी या भागातील दुकानदारांना व नागरिकांना घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी व आयुक्त म्हैसकर मॅडम व साहेबांना निवेदन दिल्यानंतर हा रस्ता झाला होता...
 परंतु या गोष्टीस आता पंधरा ते वीस वर्षे होऊन गेलेली आहेत ,त्यानंतर या रस्त्याची वाहतूक बरीच वाढल्याने या रस्त्यावर असणारे गॅरेज व दुकानदार, येथील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे...  या पंधरा वीस वर्षात या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही.. येथील लोकप्रतिनिधी व सांगली महापालिका प्रशासन जे पुड्या सोडण्यात माहीर आहे... त्यांनी प्रथमतः पाच कोटी मंजूर झाल्याची पुडी सोडली या भागातील नागरिक आनंदाने नाचू लागले ....
परंतु तो रस्ता माझ्या मते कागदावरच झाला असावा.... प्रत्यक्षात काही हा रस्ता झाला नाहीं... परत एक सहा कोटीची पुडी प्रशासनाने सोडली ....त्यानंतर देखील या भागातले नागरिक म्हणाले   ..आता हा रस्ता होईल या भागासाठी प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.... परंतु असे काही झाले नाही... 
मध्ये एकदा एका लोकप्रतिनिधींने मध्ये साठ कोटीची पुडी सोडली .... ती घोषणा सुद्धा हवेत विरली...... आणि आता 76 कोटीची पुडी सोडण्यात आलेली आहे.... आता सांगलीकर नागरिक या कोटी कोटीच्या पुड्या ऐकून ऐकून थकलेले आहेत... गेल्या बाजारी जे प्रशासन होते किंवा जे अधिकारी आहेत... त्यांच्याकडून हे काम झालं नाही ... 
 या शंभर फुटी रस्त्यावर किमान पाच ते सहा प्रभाग या रस्त्याला जोडले गेलेले आहेत जसे, सांगली एसटी स्टँड परिसर, कोल्हापूर रोड, शामराव नगर, काळे प्लॉट, एमएसईबी एरिया, डी मार्ट,  दस्तूर खुद्द महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा प्रभाग, नगरसेवक फिरोज पठाण, अभिजीत भोसले, मंगेश चव्हाण ,लक्ष्मण नवलाई बरेच दिग्गज नगरसेवक, तसेच सांगलीचे निर्वाचित पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ ,भाजपा प्रमुख इनामदार या सर्व दिग्गज लोकांच्या प्रभागातून हा रस्ता घासून जात आहे. . परंतु या लगतच्या प्रभागातील नगरसेवकांनी अथवा लोकप्रतिनिधींनी या रस्त्यासाठी आता गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आलेली आहे...
(अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत हा विषय गंभीर स्वरूपात नागरिक मनावर घेतील याची समज आम्ही आपणास देत आहोत )
आता सांगली महापालिकेसाठी सांगलीचेच असणारे सुनील पवार आयुक्त म्हणून सांगलीकरांना लाभलेले आहेत ... त्यांना ह्या रस्त्या बाबतीत सर्व ज्ञात असावे ....तरी नव्या आयुक्तांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्यासाठी या एक चांगला दिलासा देऊन हा वर्दळीचा व महत्त्वाचा रस्ता सांगलीकरांना आपल्या माध्यमातून एक चांगला रस्ता म्हणून देण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती ...
(ता.क. महापालिकेमध्ये या रस्त्यासाठी काही नगरसेवकांनी विरोध केल्याचे दिसून येत आहे ,आज आपण आपल्या प्रभागासाठी शंभर फुटी वरील येथील नागरिकांच्या समस्या व समस्यांना विरोध करू नका, नाहीतर भविष्यात जो तो नगरसेवक उठेल... आणि एकमेकांच्या प्रभागातील कामासाठी विरोध करेल. आणि हा नवा पांयडा  महानगरपालिका व नागरिकांसाठी  महानगरपालिकेत महागात पडेल .. कृपया विरोध करणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी...)                     सलीमभाई नदाफ,

अध्यक्ष: सेंचुरी मार्केट कमिटी,100 फुटी रोड सांगली,  (1107 दुकाने नोंद असलेली संस्था)

संपादक :लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, सांगली

अध्यक्ष : सांगली लोखंड मार्केट, स्क्रॅप मार्केट कोल्हापूर रोड, सांगली. (170 दुकाने नोंद असलेली संस्था)