Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR :९ वर्षा च्या इंद्रकुमारच्या मारेकर्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या-सतिश माळगे ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) कोल्हापूर




KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे

९ वर्षा च्या इंद्रकुमारच्या मारेकर्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या-सतिश माळगे ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) कोल्हापूर

राजस्थान मधील जालोर या गावी दलित मुलगा दिवंगत इंद्रकुमार मेघवाल जो नववर्षाचा होता त्याने सवर्णांसाठी ठेवलेल्या माठातून पाणी पिल्यामुळे तेथील मुख्याध्यापक यांनी तिसरी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या इंद्रकुमारास बेदम मारहाण केली व त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा दिनांक १३/०८/२०२२ रोजी मृत्यू झाला सदर मुख्याध्यापकाने पाण्यासाठी त्या चिमुकल्या बालकास अमानुषपणे मारहाण केलेली आहे व त्या मारहाणीत दिवंगत इंद्रकुमार मेघवाल हा मयत झालेला आहे इंद्रकुमार मेघवाल हा दलित मागासवर्गीय कुटुंबातील होता व तो इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत होता इंद्रकुमार मेघवाल हा दलित असल्याने तो  सुवर्णांसाठी असलेल्या पाण्याच्या माठातून पाणी पिल्यामुळे त्यास मारहाण केलेली आहे ही बाब अत्यंत अतिशय निंदनीय आहे अशा जातीवादी लोकांविरुद्ध सदरचा खटला जलद न्यायालयामध्ये जलद गतीने चालवून त्या नराधमास मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच असे भयंकर कृत्य सदर ठिकाणी घडलेली असताना देखील तेथील राज्य सरकार आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याच्या तयारीत दिसून येत नाही सदर राज्यामध्ये दलितांच्या वरील अन्याय त्याच्या रोखण्यामध्ये राजस्थान सरकार अपयशी ठरलेले आहे तरी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अशी मागणी करत आहोत राजस्थान गहलोत सरकार तात्काळ बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती लागवट सुरू करावी या मागण्यांसाठी ऐतिहासिक दसरा चौकात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोल्हापुर जिल्हा नेते सतिश (दादा) माळगे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निदर्शने करण्यात आली.



यावेळी उमेश माने (अण्णा) प्रदीप ढाले,दत्ता पाटील(वस्ताद)सनी वाचणे(पैलवान) अमर दाभाडे,निलेश कांबळे, रणजीत कांबळे ,रितेश कांबळे ,श्रीधर कांबळे,अनिल कांबळे, विजय गोंदणे,रविराज सदाजय, बाबासो कांबळे,तुषार नाईकनवरे, अविनाश पाटील,संदीप मदाळे,रुपेश आठवले,प्रशांत पाटील,भरत पासवान, बबन शिंदे,युवराज गुरव, शिरीष थोरात,विक्रांत कांबळे,शुभम कांबळे, अमित कांबळे ,अभिजीत कांबळे, अविनाश कांबळे ,गौतम कांबळे,चेतन कांबळे,धीरज कांबळे,महेश कांबळे, राजू वायदंडे,महेश इंचगावकर,अशोक कांबळे,बाबासो पवार,वर्षा कांबळे, सर्जेराव ढाले यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे महिला कार्यकर्त्या तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली