SANGLI : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी



SANGLI : 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी

सांगली, दि. 25, : सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 अखेर गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी सांगली व मिरज शहरामध्ये बहुसंख्य लहान मुले, स्त्रिया, पुरूष गर्दी करीत असतात. यावेळी कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरीकांच्या जिवितास धोका पोहचू नये याकरीता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये सांगली व मिरज शहरातील विविध मार्गावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी वापरण्यात येणारी वाहने, पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिग्रेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना सांगली व मिरज शहरामध्ये खालीलप्रमाणे मनाई आदेश लागू केला आहे.




सांगली शहर - मनाई आदेश लागू करण्यात आलेले दिवस, वेळ व कंसात कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 11.59 वाजेपर्यंत (गणेश आगमन), 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत (5 वा दिवस विसर्जन), 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत (7 वा दिवस विसर्जन), 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत (9 वा दिवस विजर्जन), 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत (अनंत चर्तुदशी विसर्जन).




मनाई आदेश लागू करण्यात आलेली ठिकाणे व रोड पुढीलप्रमाणे. टिळक चौक - गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, जोग ज्वेलर्स - सराफ कट्ट्याकडे जाणारा रस्ता, गारमेंट सेंटर - मारूती चौकाकडे जाणारा रस्ता, बालाजी चौकाकडे जाणारा रस्ता, मैत्रिण कॉर्नर - करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, सांगली शहर पोलीस ठाणे - करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, राजवाडा चौक - पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, स्टेशन चौक - टेलीफोन ऑफिसकडे जाणारा रस्ता, जुना बुधगाव रोड - बायपासकडून वखारभागाकडे जाणारा रस्ता, जामवाडी कॉर्नर - पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, कर्नाळ पोलीस चौकी - तानाजी चौकाकडे जाणारा रस्ता, गवळी गल्ली - झांशी चौकाकडे जाणारा रस्ता, मगरमच्छ कॉलनी (क्रॉस रोड) - सराफ कट्ट्याकडे जाणारा रस्ता, वसंतदादा समाधी स्थळ (क्रॉस रोड) - गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, नवसंदेश कार्यालय - आनंद टॉकीकडे जाणारा रस्ता, कामगार भवन - आमराईकडे जाणारा रस्ता.



महानगरपालिकेतर्फे (लाकडी/बांबूचे) बॅरेगेटींग - देशपांडे बिल्डींग (वखारभाग) - पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, वखारभाग ते गवळी गल्लीकडून हायस्कूल रोड व गणपती पेठेस मिळणारे सर्व रस्ते.

मनाई कालावधीत पर्यायी वाहतूक मार्ग -

मिरजकडून येणाऱ्या व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - पुष्पराज चौक - सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकार नगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील). इस्लामपूरकडून येणाऱ्या व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - इस्लामपूर टोलनाका - बायपास - कॉलेज कॉर्नर - आपटा चौकी - पुष्पराज चौक - सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकार नगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील). तासगाव, विटा कडून सांगलीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी - कॉलेज कॉर्नर - आपटा चौकी - पुष्पराज चौक - सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकार नगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील).



मिरज शहर - मनाई आदेश लागू करण्यात आलेले दिवस, वेळ व कंसात कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दि. 10 सप्टेंबर रोजीचे दुपारी 4 वाजेपर्यंत ( 8 सप्टेंबर - 9 वा दिवस विसर्जन, 9 ते 10 सप्टेंबर - अनंत चर्तुदशी विसर्जन).
मनाई आदेश लागू करण्यात आलेली ठिकाणे व रोड - श्रीकांत चौक - श्रीकांत चौकात येणारे रस्ते, स्टेशन चौक - मिरासो दर्ग्याकडे जाणारा रस्ता, हिरा हॉटेल - मिरज शहर पो. ठाणेकडे जाणारा रस्ता, फुलारी कॉर्नर - फुलारी कॉर्नरकडे येणारे सर्व रस्ते, बॉम्बे बेकरी - बॉम्बे बेकरीकडे येणारे सर्व रस्ते, किसान चौक - श्रीकांत चौक व पोलीस ठाणेकडे जाणारा रस्ता, दत्त चौक - श्रीकांत चौकाकडे जाणारा रस्ता, जवाहर चौक - किसान चौकाकडे जाणारा रस्ता, भोसले चौक - पाटील हौदाकडून भोसले चौकाकडे जाणारा रस्ता, झारी मस्जिद कॉर्नर - बॉम्बे बेकरीकडे जाणारा रस्ता, श्रीकांत चौक ते गणेश तलाव या मार्गावर येणारे सर्व रस्ते.

पर्यायी वाहतूक मार्ग - सोलापूरकडून मिरज म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जाणारी वाहने - तासगाव फाटा - सुभाषनगर - विजयनगर मार्गे म्हैशाळ - कागवाड मार्गे कर्नाटककडे जातील (पतरीचा मार्ग हाच राहील). सोलापूरकडून मिरज मार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहने - सोलापूर - पंढरपूर - गांधी चौक - वंटमुरे कॉर्नर - भारती हॉस्पीटल - विश्रामबाग - धामणी - अंकली - कोल्हापूरकडे जातील (परतीचा मार्ग हाच राहील). शास्त्री चौकाकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहने - (१) कर्नाटकातून म्हैशाळ मार्गे कोल्हापूरला जाणारी वाहने - म्हैशाळ - शास्त्री चौक - महात्मा फुले चौक - रेल्वे ब्रीज मार्गे कोल्हापूरकडे जातील. (२) कोल्हापूरकडून म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जाणारी वाहने - अंकली फाटा - रेल्वे ब्रीज - महात्मा फुले चौक - शास्त्री चौक - म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जातील. कृष्णा घाट मार्गे शिरोळ तालुक्याकडे जाणारी वाहने - (१) शास्त्री चौक - महात्मा फुले चौक - रेल्वे ब्रीज - अंकली फाटा - उदगाव मार्गे शिरोळ कोल्हापूरकडे जातील. (२) कृष्णा घाट मार्गे मिरजकडे येणारी वाहने कृष्णा नदीच्या पलिकडून उदगाव - अंकली मार्गे मिरजकडे जातील. सुभाषनगरकडून मिरजकडे येणारी वाहने - (१) सुभाषनगर - गाडवे चौक - वखारभाग - पंचशील चौक - मार्गे जवाहर चौक - शास्त्री चौक - मार्गाचा वापर करतील. (२) सुभाषनगरकडून सांगली एमआयडीसीकडे जाणारी वाहने दिंडीवेस - आळतेकर हॉल - शिंदे बंगला - कर्मवीर भाऊराव चौक - बसाप्पा हलवाई कॉर्नर - मिशन हॉस्पीटलच्या मार्गे सांगलीकडे जातील.

पार्किंगची व्यवस्था - जनावर बाजार (टिळक चौक) - इस्लामपूर व सांगलीवाडी कडून येणाऱ्या वाहनांसाठी. जुनी जयश्री टॉकीजच्या मागे (हरभट रोड) - चारचाकी वाहनांसाठी (पे-पार्किंग). शिवनेरी हॉटेलच्या मागे (भावे नाट्यगृहालगत) - दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी. वैरण बाजार (तरूण भारत स्टेडीयम समोर) - कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी. राजवाडा पटांगण - पलूस - नांद्रेकडून येणाऱ्या वाहनांसाठी. कोर्ट आवार - दुचाकी वाहनांसाठी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम - तासगाव - मिरजकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पीटल तासगाव कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम - दुचाकी पार्किंगसाठी. सांगली हायस्कूल आमराई जवळ - टिंबर एरियाकडून येणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी. कर्नाळ पोलीस चौकीचे मागील पटांगण (जामवाडी) - कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. पटेल चौक क्रिडा मंडळ कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. शिवाजी क्रिडांगण - कोल्हापूर, सांगली कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. न्यू इंग्लीश स्कूल - कवठेमहांकाळ, मालगाव, सुभाषनगरकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. मिरज हायस्कूल - आरग, बेडग कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. आयडीएल हायस्कूल - टाकळी, बोलवाड, एरंडोली कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. महात्मा फुले चौक - कर्नाटक, म्हैशाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. साठे पुतळ्याच्या माठीमागील बाजूस - वाहनांची गर्दी झाल्यास पर्यायी पार्किंग व्यवस्था.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली