KOLHAPUR : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून क्रांती घडली महाविकास आघाडी गटनेते- किरण माळी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून क्रांती घडली महाविकास आघाडी गटनेते- किरण माळी
KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून क्रांती घडली महाविकास आघाडी गटनेते- किरण माळी

कुंभोज ता हातकणंगले येथील समस्त मातंग समाज इंदिरा नगर यांच्या वतीने  लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य फोटो मिरवणुक काडण्यात आली.सदर रथ व प्रतिमा पूजन महा विकास आघाडीचे गटनेते किरण माळी,रावसाहेब पाटील, सदानंद महापुरे, माजी उपसरपंच दावीद घाटगे ,ग्रामपंचायत सदस्य आप्पासो पाटील ,माजी उपसरपंच धनाजी तिवडे ,जखय सुवासे, याकूब घाटगे, कुमार भोरे, सागर सुवासे, याकूब सुवासे,व सर्व ग्रामपंचायत सदस्य कुंभोज.उपस्थित होते.


         लोकशाहिर अण्णाभाऊंची साठेची लेखणी म्हणजे जाणीव. ज्या ज्या वेळी त्यांच्या हाती पेन आला तो एक तलवार होउनच. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यीक ही होऊ शकतो, हे अण्णाभाऊनी दाखवून दिले. अण्णाभाऊ साठे अमर शेख, द. ना. गव्हाणकर या शाहिरांनी आपल्या बुलंद आवाजांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आकाशच पेटवून दिले. अण्णाभाऊंची शाहिरी म्हणजे त्यांच्या हातातील तळपती तलवार होती. असे गौरवोउद्गार महावीकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांनी काढले 

          यावेळी वाद्याच्या गजरात इंदिरा नगर माळभाग पासून बस स्टॉप,  दीपक चौक, आंबेडकर चौक, मार्गे फटाक्याची आतीषबाजी करत  मिरवणूक काढण्यात आली यावेळी इंदिरा युवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते व मित्रमंडळी नागरिक व महिला उपस्थित होत्या.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली