MUMBAI : राकेश झुनझुनवाला: शेअर बाजाराचा बाप माणूस.... फक्त पाच हजार रुपयांपासून केलेली सुरुवात... आज 55 हजार कोटीचा झाला मालक. ....अनंतात विलीन..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI : राकेश झुनझुनवाला: शेअर बाजाराचा बाप माणूस.... फक्त पाच हजार रुपयांपासून केलेली सुरुवात... आज 55 हजार कोटीचा झाला मालक. ....अनंतात विलीन..



MUMBAI :
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

राकेश झुनझुनवाला: शेअर बाजाराचा बाप माणूस....
फक्त पाच हजार रुपयांपासून केलेली सुरुवात... आज 55 हजार कोटीचा झाला मालक. .... अनंतात विलीन

देशातील दिग्गज उद्योगपती राकेश झुनझुनवाला राहिले नाहीत. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6.45 वाजता, मुंबईच्या ब्रिज कँडी हॉस्पिटलने राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूची पुष्टी केली, ज्यांना भारताचे वॉरन बफे मानले जाते. राकेश झुनझुनवाला यांना काही दिवसांपूर्वी दीर्घ आजारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

राकेश झुंझुवाला यांचा जन्म 5 ऑगस्ट 1960 रोजी झाला, ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होते. ते रेअर एंटरप्रायझेस नावाची कंपनी चालवत होते जी त्यांचे आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचे पोर्टफोलिओ व्यवस्थापन पाहते.



राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीने आता आकासा एअरने आपली हवाई सेवा सुरू केली आहे. 7 ऑगस्ट रोजी आकासा एअरच्या उद्घाटनानिमित्त राकेश झुनझुनवाला व्हील चेअरवर पोहोचले होते. राकेश झुंझुवाला यांनी एकदा प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांना ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अमेरिकेचे मोठे गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांना त्यांच्या नवीन घरी जेवणासाठी आमंत्रित करायचे आहे. ते म्हणाले की हे त्याचे स्वप्न आहे पण आता ते कधीच पूर्ण होणार नाही हे त्याना माहीत होते .


झुनझुनवाला यांची प्रतिमा 'अलादीनच्या दिव्यासारखी'

राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारात अलादीनच्या दिव्यासारखे गुंतवणूकदार मानले जात होते. स्टॉक मार्केट ट्रेडर असण्यासोबतच ते चार्टर्ड अकाउंटंट देखील होते. हंगामा मीडिया आणि अपटेक कॉम्प्युटरसारख्या कंपन्यांचे ते अध्यक्ष होते. याशिवाय ते व्हाइसरॉय हॉटेल्स, कॉनकॉर्ड बायोटेक, प्रोव्होग इंडिया आणि जिओजी फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपन्यांच्या संचालक मंडळावर ही होते. राकेश झुनझुनवाला यांना त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासूनच शेअर बाजारामध्ये रस होता आणि त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच शेअर बाजारात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी प्रवेश घेतला, परंतु तेथून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी शेअर बाजारालाच करिअर म्हणून निवडले.



झुनझुनवाला यांनी केवळ पाच हजार रुपयांच्या भांडवलातून शेअर बाजाराचा प्रवास सुरू केला
अब्जाधीश गुंतवणूक असलेल्या व लाखो लोकांना शेअर मार्केट बद्दल सल्ला देणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले




राकेश झुंझुवाला यांनी 1985 मध्ये केवळ 5000 रुपयांच्या भांडवलाने शेअर बाजारात आपला प्रवास सुरू केला. सप्टेंबर 2018 मध्ये त्यांचे भांडवल 11,000 कोटी रुपये झाले. फोर्ब्स मॅगझिननुसार, त्यावेळी ते संपत्तीच्या बाबतीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 48 व्या क्रमांकावर होते. जुलै 2022 पर्यंत त्यांची एकूण संपत्ती सुमारे $550 अब्ज (भारतीय रुपयांमध्ये सुमारे 55000 कोटी रुपये) आहे. देशातील श्रीमंतांच्या यादीत तो 36 व्या क्रमांकावर होता.

झुनझुनवाला हे नेहमीच स्टॉक मार्केटमध्ये जोखीम घेणारे व्यापारी मानले जातात. फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त परतावा देतो असे सांगून त्याने त्याच्या भावाच्या ग्राहकांकडून पैसे घेतले होते आणि त्याने तसे केले होते, असे सांगितले जाते.

राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्टा आणि दोन मुले आर्यमन आणि आर्यवीर असा परिवार आहे.



    राकेश झुणझूणवाला - हा तर ययाति !!

55 हजार कोटींचा मालक होता. शेअर मार्केट कोळून प्यालेला माणूस.
1 ) मी माशासारखी दारू पितो म्हणायचा. सिगारेटला तर मोजदाद नव्हती. मधुमेह होऊन पाय सुजला आणि खुर्चीवरच आयुष्य जाऊ लागलं तेंव्हा म्हणाला, आयुष्याला शिस्त हवी. व्यायाम करायला हवा होता.

2 ) 1985 ला 5 हजार रुपयांची पहिली गुंतवणूक केली होती.2022 ला एकूण मालमत्ता 46 हजार कोटीवर गेली. याबद्दल कसं वाटतंय म्हणून विचारल्यावर म्हणाला, "कोण मोजत बसलंय संपत्ती? कुणाला दाखवायची आहे बॅलन्स शीट? माझी एक पार्टनर आहे पण तिलाही त्यात इंटरेस्ट नाही. आणि सध्याच्या तुलनेत 15-20 % संपत्ती असती तरी तीच गाडी, तेच घर असतं, तीच व्हिस्की पीत राहिलो असतो!"

3 ) राकेश झुणझूनवाला रिस्क घ्यायला कचरत नव्हता. रिटर्न मिळण्याची एकदा खात्री वाटली की बायकोच्या बांगड्या विकून गुंतवणूक करेन म्हणायचा.

4) 46 हजार कोटींचा मालक होता, पण पंतप्रधान मोदींना भेटायला गेला तेंव्हा शर्ट चुरगाळलेला होता. विचारल्यावर म्हणाला,600 रुपयांचा शर्ट होता, एकदा इस्त्री केली, पण पुन्हा चुरगाळला, मी काय करू? निर्मला सीतारामणला भेटला तेंव्हा पायात फ्लोटर होती.

5 ) झुणझूनवाला बोलायला बेधडक होता. मला मार्केट आणि स्त्रियांमध्ये जास्त रस आहे म्हणायचा....

 माझी पोरं 25 वर्षांची झालेली बघायची आहेत म्हणायचा, पण 2009 ला जन्मलेली जुळी पोरं अजून 14 च वर्षांची आहेत. मुलगी मात्र 18 वर्षांची आहे. पत्नी रेखा सोबत लग्न 1987 ला झाले,.  पण मुलं 17 वर्षांनी झाली.ययातिसारखे सारे भोगून झाल्यावर झुणझूनवाला "आयुष्याला शिस्त हवी होती" म्हणत राहिला. आपल्यासाठी हा एक मेसेजच.!!!


राकेश झुनझुनवाला एक आगळावेगळा माणूस........
 ...... चार्टट अकाउंटंट असलेली ही व्यक्ती.. त्यांच्या वडिलांच्याकडे काही रक्कम उधारीने व्यवसायासाठी मागितले परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना दिली नाही तर त्यांनी बाहेरून पाच हजार रुपयेची जोडणी करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली व आज त्यांच्याकडे 55 हजार कोटी पेक्षा जास्तची संपत्ती आहे.... म्हणतात ना मनात आणलं तर माणूस काहीही करू शकतो.... पण त्याची मनाची शक्ती( इंटरनल पावर ) व प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल तर तो जग जिंकू शकतो ...राकेश झुनझुनूवाले यांचे म्हणणं असं होतं की , त्यांनी कधीही आलिशान वागणं केलं नाही   .ते साधे वागायचे... एकदा ते  पंतप्रधान मोदींना भेटायला गेल्यानंतर त्यांचा शर्ट चुरगळलेला होता तर त्यांना मोदींनी विचारलं तर ते म्हणाले हा सहाशे रुपयेचा शर्ट आहे .. चुरगळला आता मी काय करू...पायात साधी चप्पल असायची परंतु त्यांनी कधी दिखावा केला नाही... आणि हेच या मोठ्या माणसांची दानत असते .. नाहीतर आज जगात कपड्याकडे बघूनच त्याची उंची व किंमत ठरवली जाते ...परंतु कपड्यांमध्ये काही नाही .. वागण्यामध्ये काही नाही... या हजारो कोटीच्या मालक असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी हा कधी बडे जॉव केला नाही... त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या  व्यवसायाकडे लक्ष दिले ...ते लाखो लोकांचे व बऱ्याच कंपन्यांचे सल्लागार व सहाय्यक होते ....झुनझुनवाला आणि आपली गुंतवणूक कुठे केली याच्यामागे लाखो लोक त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून त्यात मध्ये आपला नफा मिळवत होते  ...आणि कंपन्याची देखील सर्व माहिती घेऊन ते सुद्धा कंपनीमध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे मिळवत होते ..अशा या थोर राकेश झुनझुनवाला यांना... लोकसंदेश न्यूज मीडियाचा सलाम......

संपादक : लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ,सांगली