MUMBAI : शिवसंग्राम प्रमुख आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI : शिवसंग्राम प्रमुख आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन



MUMBAI 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

शिवसंग्राम प्रमुख आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन.




मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.

अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे. अखेर त्यांनी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

दरम्यान, पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने डाव्या बाजून धडक दिली. ट्रकच्या बंपरमध्ये आमची गाडी अडकली आणि आम्हाला फरपटत नेलं असं त्यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांनी सांगितलं आहे. त्यानंतर मी पोलिसांना १०० नंबरवर कॉल केला पण त्यांची मदत लवकर मिळाली नाही. तब्बल एका तासानंतर आम्हाला मदत मिळाली असा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे.मराठा आरक्षणासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने गेली अनेक वर्षे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून योगदान दिले होते. त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.




                 अपघात कसा झाला ?

विनायक मेटे यांच्या गाडीला ज्या भागात अपघात झाला, त्या भागाचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी माध्यमांना माहिती दिली.

ते म्हणाले, "एक मोठा ट्रक होता आणि त्याला पाठीमागून गाडीनं ठोकलं असं सकृतदर्शनी कळत आहे. पण, तपासामध्ये सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील."

"सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातानंतर ट्रक निघून गेलाय. तपासामध्ये बऱ्याचशा गोष्टी निप्षन्न होतील. यात जवळपास 8 टीम तपास करत आहेत," असंही ते म्हणाले.

            मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या आजच्या बैठकीला येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांचं अपघाती निधन झालं आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांची भावना होती, शासन त्यासोबत आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विनायक मेटे यांच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "आम्ही विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो."

आपल्याला भारताला अपघातमुक्त करायचं आहे, हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल." नितीन गडकरी 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं, "महाराष्ट्राच्या विकासकामात विनायक मेटेंनी नेहमी भाग घेतला. एक चांगला मित्र आम्ही गमावलाय. या अपघाताचं नेमकं कारण काय माहिती नाही. आपल्याला भारताला अपघातमुक्त करायचं आहे, हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल."


   विनायक मेटेंचं निधन वेदनादायी – शरद पवार

आज अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. विनाय मेटे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात विनायक मेटे यांनी मोलाची कामगिरी केली. मराठा समाजासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केलं. ते सामाजिक प्रश्नाची मांडणी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असत, त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

      विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात       अंत्यसंस्कार होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश

विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक,अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शिवस्मारक, मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्रातील इतर विषयांकरिता आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो. भावपूर्ण श्रद्धांजली! असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

   लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई