MUMBAI मुंबईकरांसाठी मोठी बातमी: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; कुठे, किती वाजता लोकल रद्द?

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI मुंबईकरांसाठी मोठी बातमी: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; कुठे, किती वाजता लोकल रद्द?




MUMBAI मुंबईकरांसाठी मोठी बातमी: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; कुठे, किती वाजता लोकल रद्द?

मुंबई : मध्य रेल्वेने भायखळा ते माटुंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते कांदिवली दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत लोकल विलंबाने धावणार असून काही लोकलफेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वे स्थानक : भायखळा ते माटुंगा वेळ : सकाळी १२.४० ते सायं. ५.४० मार्ग : अप आणि डाऊन जलद परिणाम : शनिवार रात्री ११ ते रविवारी पहाटे ४.३० पर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल.




 तसेच रविवारी दिवसादेखील ब्लॉक असेल. ब्लॉकच्या वेळेत जलद मार्गावरील लोकलफेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

 हार्बर रेल्वे स्थानक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे वेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० मार्ग :अप आणि डाऊन परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई/वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकलफेऱ्या रद्द राहणार आहे. 




गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील. पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल २० मिनिटांच्या फरकाने धावतील. पश्चिम रेल्वे स्थानक - बोरिवली ते कांदिवली मार्ग - अप आणि डाऊन धीमा वेळ - सकाळी १० ते दुपारी ३ परिणाम - ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावरून धावणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई