SATARA: अवैध विदेशी दारु माल वाहतुक करणाऱ्यांच्या शाहूपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA: अवैध विदेशी दारु माल वाहतुक करणाऱ्यांच्या शाहूपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या.



SATARA
संभाजी गोसावी प्रतिनिधी सातारा

अवैध विदेशी दारु माल वाहतुक करणाऱ्यांच्या शाहूपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या. शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची छापा कारवाई. ( 84,834 / - रुपये किंमतीचा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त

सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष माननीय पोलीस अधीक्षक श्री . अजयकुमार बन्संल यांनी दि . 16/08/2022 रोजीपासुन अवैध धंदे व अवैध शस्त्रे यांचेविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणे बाबत जिल्हयांतील सर्व पोलीस ठाणेंना आदेश दिलेले आहेत . त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत . सदर मोहीमेच्या चौथ्या दिवशी आज दि .19 / 08 / 2022 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांना त्यांचे बातमीदारामार्फत सातारा शहरातील बुधवारनाका ते मोळाचा ओढा जाणारे रोडने एक इसम पांढरे रंगाचे अॅक्टीव्हा मोटारसायकल वरुन विदेशी दारुची चोरटी वाहतुक करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती . या बातमीचे अनुषंगाने छापा कारवाई करणेसाठी त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार केले . सदर पथकांने बुधवारनाका ते मोळाचा ओढा जाणारे रोडवर रांगोळे कॉलनीतील उत्कर्ष इमारतीचे समोर रस्त्यालगत सापळा रचला .


दुपारी 13.20 वा.चे सुमारास मिळाले बातमी प्रमाणे एक पांढरे रंगाची अॅक्टीव्हा मोटारसायकल बुधवारनाका बाजुकडुन येतांना दिसली . दबा धरुन बसलेल्या पोलीस पथकांने सदर मोटारसायकलस्वारांस थांबणेचा इशारा केला परंतु तो न थांबता तसाच पुढे जावु लागला म्हणुन पोलीस पथकांने सदर मोटारसायकलचा पाठलाग करुन त्यांस कच्छी बझार इमारतीचे समोर रोडवर पकडले .


या वेळी पथकांने सदर इसमांची व मोटारसायकलची झडती घेतली असता मोटारसायकलवर असले दोन मोठया बॅगांमध्ये विदेशी दारु मॅकडॉनल नंबर 1 विस्की , सेलिब्रेशन रम , ओल्ड मंक , रॉयल स्टॅग , DSP ब्लॅक , इंम्पेरियल ब्लु , डॉक्टर ब्रॅन्डी , रोमॅनो व्होडका , दारु ग्रॅन्ड मास्टर मॅन्गो व्होडका , रॉयल चॅलेंज , ऑफीसर चॉईस वगैरे अशा एकूण 221 विदेशी मद्याच्या बाटल्या मिळुन आल्या

सदर इसमाकडे विदेशी दारुची वाहतुक करणेचा परवाना आहे काय याबाबत माहीती घेतली असता त्याने परवाना नसल्यांचे सांगितले . सदरचा इसम बेकायदा विदेशी दारुची वाहतुक करत असल्यांचे निष्पन्न झालेने पोलीसांनी सदरचा 82,834 / -रु.चा विदेशी दारुचा माल जप्त करुन विदेशी दारु वाहतुक करणा - या इसमांस ताब्यांत घेतले

सदर इसमाविरुदध पो.कॉ. स्वप्निल सावंत यांनी फिर्याद दिल्यांने गुन्हा दाखल करणेत आला आहे . अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचुन अवैध विदेशी दारु मालाची वाहतुक करणा - या इसमास पकडुंन छापा कारवाई करत त्याचेकडुंन 84,834 / रुपये किंमतीचा विदेशी दारुचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई मा . पोलीस अधीक्षक श्री . अजयकुमार बन्सल , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . अजित बो - हाडे , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे , पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी , लैलेश फडतरे , पो.ना. अमित माने , स्वप्निल कुंभार , ओंकार यादव पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल सावंत , सचिन पवार आदीं पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली