PATNA : बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, एनडीएमधून बाहेर.. आता राष्ट्रीय जनता दलासह सरकार स्थापन करणार....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

PATNA : बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, एनडीएमधून बाहेर.. आता राष्ट्रीय जनता दलासह सरकार स्थापन करणार....PATNA
बिहारमध्ये नितीश कुमार भाजप सरकार कोसळलं !! भाजपच्या 16 मंत्र्यांचा राजीनामा ! नितीशकुमार यांनी वेळीच ओळखला भाजपचा डाव....!

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, एनडीएमधून बाहेर.. आता राष्ट्रीय जनता दलासह सरकार स्थापन करणार....

 बिहारच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूने एनडीए सोबतची युती तोडल्याचं जाहीर केलं आहे. नितीश कुमार यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा दिला.

नितीश कुमार यांनी भाजपला दे धक्का दिल्यानंतर आता बिहारमधील राजकीय समीकरणं बलणार आहेत. आज नितीश कुमारांच्या घरी खासदार आणि आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.


बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्या सहकार्याने  नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. या नव्या सरकारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील अशीही माहिती आहे.

एनडीएसोबत काडीमोड घेत नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का दिल्याचं सांगितलं जातंय. भाजप-जेडीयू सरकारला दोन वर्षेही पूर्ण झाली नाहीत, तोपर्यंत हे सरकार पडलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपमध्ये वाद सुरू होता. आता हा वाद शिगेला पोहोचला असून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे.


नितीश कुमार यांनी या आधीही भाजपसोबत युती तोडली होती. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला कमी जागा असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. भाजपने उपमुख्यमंत्रीपद घेतलं होतं. त्यानंतर भाजपने नितीशकुमार यांच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सातत्याने केला जात होता.

बिहारमध्ये आता नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा राजद एकत्र येत उद्या यांचा शपथविधी पार पडत आहे. या नव्या सरकारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील तर तेजस्वी यादव यांनी गृहमंत्रीपद त्यांच्या पक्षाकडे राहावं यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात एकीकडे भाजप आघाडीचे सरकार सत्तेत येत असताना दुसरीकडे बिहारमधील सरकार कोसळलं आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू आणि शिवसेना हे भाजपचे जुने सहकारी आहेत. पण सध्या या दोन्ही पक्षांनी एनडीएची साथ सोडली आहे.

भाजप गेल्या काही दिवसापासून दिल्लीतील संयुक्त जनता दलाच्या खासदारांना फितवत असल्याचे व अमित शहा यांना नितेश कुमार यांचा पक्ष फोडायचा असल्याचे आरोप होत होते. त्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी आर. पी  सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली व त्यांचा राजीनामा घेतला होता. त्यानंतर दोन दिवसातच या सर्व घडामोडी घडल्या आहेत.

भाजपला विशेषतः अमित शहा यांना बिहारचा एक हाती रिमोट कंट्रोल हवा असल्याची माहिती मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मिळाल्याने ते सावध झाले होते.
महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमध्येही भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी आपल्या पक्षातील खासदार फोडू शकते याची शक्यता लक्षात घेऊन नितीश कुमार यांनी हे पाऊल उचलले.

 
काल शेवटचा पर्याय म्हणून गृहमंत्री नितीश अमित शहा यांनी नितेश कुमार यांना संपर्क साधला होता. मात्र आज नितेश कुमार हे राज्यपालांची भेट घेणार होते त्याची कुणकूण लागल्याने त्या अगोदरच भाजपने बैठक घेतली आणि त्यामध्ये नितीश कुमार यांनी जाहीर करण्याऐवजी अगोदरच भाजपने सरकार अल्पमतात आल्याचे जाहीर केले.


बिहारमधील नितीश कुमार आणि भाजपमधील वाद तीव्र टोकाला गेल्यानंतर आज दुपारी उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर भाजपच्या 16 मंत्र्यांनी थेट राज्यपालांकडे राजीनामा दिला आणि नितीशकुमार सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या महिन्यापासून नितीश कुमार आणि भाजपमध्ये काहीतरी बिनसले असल्याची चर्चा होती. निती आयोगाच्या बैठकीसह राष्ट्रपतींच्या भोजनाकडेही नितीश कुमार यांनी पाठ फिरवली होती. त्याचबरोबर ते नरेंद्र मोदी यांच्या रॅलीतही सहभागी झाले नव्हते.

       बिहारमध्ये कोणाच्या किती जागा?

बिहारमध्ये एकूण जागा 243. बहुमतासाठी आवश्यक जागांची संख्या - 122, तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल - 75, भारतीय जनता पक्ष - 74, नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल 43, काँग्रेस - 19

2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?

राजद - 80, काँग्रेस - 27, जदयू - 71, भाजप 53, लोजप - 2, रालोसप - 2, हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर) - 1, एकूण जागा - 243

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई