SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली
सांगली येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने यांची क्रांती दिनानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट घेतली तसेच सत्कार करून आशिर्वाद घेतला त्यांनी स्वातंत्र्य काळातील आठवणी जागा केल्या
या वेळी माधवराव माने यांनी स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाच्या स्मृतींना उजाळा देताना ब्रिटीशांना चलेजाव चा नारा दिल्यानंतर ग्रामीण भागांमध्ये तीव्र झालेली स्वातंत्र्य चळवळ, तासगाव मोर्चा, वडूजचा संग्राम, क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नेतृत्व आणि प्रतिसरकारची कामगिरी, लुटमाऱ्या करून जनतेला हैराण करणाऱ्या दरोडेखोरांचा केलेला बंदोबस्त या बद्दलच्या जाज्वल्य स्मृतिंना उजाळा दिला. यावेळी त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती सप्ताहात त्यांच्या सारख्या सच्चा सैनिकाचा सत्कार होत आहे याबद्दल मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे
तसेच त्यांचा हस्ते *घरोघरी तिरंगा* अभियानास सुरुवात केली यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पनाताई कोळेकर, अनिल माने, जगन्नाथ तांदळकर हनमंत सरगर, गणपती साळुंखे व कुटुंबीय उपस्थित होते..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली