SANGLI : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची मुंबई नगरपालिका प्रशासन विभागाच्या उपसंचालकपदी बदली ...सुनील पवार सांगलीचे नवे आयुक्त

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची मुंबई नगरपालिका प्रशासन विभागाच्या उपसंचालकपदी बदली ...सुनील पवार सांगलीचे नवे आयुक्त




SANGLI
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची मुंबई नगरपालिका प्रशासन विभागाच्या उपसंचालकपदी बदली....  ..सुनील पवार सांगलीचे नवे आयुक्त




- सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांची नवी मुंबई येथील नगरपालिका प्रशासन विभागाच्या उपसंचालकपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी कल्याण-डोबिवलीचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची नियुक्ती झाली आहे. तसे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी दिले आहेत पवार हे मूळचे सांगली जिल्ह्याचे असून त्यांनी पूर्वी सांगलीच्या उपायुक्तपदाची जबाबदारी पार पाडली आहे.



महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांची नवी मुंबईला नगरपरिषद संचालनालयात उपायुक्तपदी बदली झाली आहे. भाजपचे स्थानिक दोन्ही आमदार, भाजप पदाधिकारी, नगरसेवकांच्या नाराजीचा फटका बसल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच कापडणीस यांच्या बदलीचा आदेश निघाला.

सुनिल पवार यांनी मुख्याधिकारी पदापासून प्रशासकीय कारकिर्दीत सुरुवात केली होती त्यांनी आष्टा, इचलकरंजी नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणूनही काम केले होते. त्यानंतर सांगली महापालिकेत २०१५ ते २०१८ या कालावधीत उपायुक्त म्हणून कार्यरत होते चार वर्षानंतर पवार यांची सांगली महापालिकेत बदली झाली असून आता ते आयुक्त म्हणून पुन्हा महापालिकेत येत आहेत. विद्यमान आयुक्त कापडणीस यांंचा तीन वर्षांचा कार्यकाल जुलै महिन्यात पूर्ण झाला होता

कापडणीस यांच्या काळात शहरातील अनेक नव नवीन कल्पनाना गती मिळाली. काळी खण, चौक सुशोभिकरणासून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम झाले, मध्यवर्ती निदान केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना विविध चाचण्या अल्पदरात उपलब्ध करून दिल्या. कोरोना काळात कोवीड रुग्णालय सुरू करून यावर मोफत उपचार करण्यात आले, त्यांच्या काळात दोनदा शहराला महापूराचा फटका बसला. या काळात नागरिकाचे स्थलांतर, निवास, भोजनाची व्यवस्था महापालिकेकडून
करण्यात आली होती

लोकसंदेश मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली