SANGLI : शिरढोणची बिसमिल्ला जमादार याची आसाम रायफलमध्ये निवड:

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : शिरढोणची बिसमिल्ला जमादार याची आसाम रायफलमध्ये निवड:
SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी महंमद आत्तार.

शिरढोणची बिसमिल्ला जमादार याची आसाम रायफलमध्ये निवड:

मिरज येथे ईदगाह मैदान व मिरज वार्ताच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून बिसमिल्ला बैतुल जमादार वय-19 मुळगाव शिरढोण.येथील एका मुस्लिम विद्यार्थीनीची आसाम रायफलमध्ये अधीकारी पदासाठी निवड झाल्याबद्दल मिरज येथील शाही ईदगाह कमिटीतर्फे शाही सत्कार करण्यात आला.बैतूल जमादार यांची ही सुकन्या,तीन मुली पती-पत्नी असा परिवार,पत्नीला पँरलिसचा आजार तसेच बैतुल जमादारचा मिरज येथे गांधी चौकात छोटेसे घड्याळाचे दुकान अशा परिस्थितीत मुलींना शिकवीले.थोरली मुलगी बिसमिल्ला हिला 12वी पर्यंत शिकवून पुढे अकँडमी प्रवेश मिळवीला.व तेथून बिसमिल्ला ची आसाम रायफलमध्ये निवड झाली.


महापालीका क्षेत्राचे प्रदेशाध्यक्ष उत्तम आबा कांबळे म्हणाले मुस्लिम मुली शिक्षणाला वंचित असतात,परंतू या मुस्लिम मुलीचा अनुभव सर्व मुलींनी घेण्यासारखा आहे.
यावेळी उपस्थित शाही ईदगाह कमिटीचे चेअरमन महेबूब अली मणेर,स्वाभिमाणी गुंठेवारी संघर्ष समिती महापालीका क्षेत्राचे अध्यक्ष युनुस भाई चाबुकस्वार , प्रदेशाध्यक्ष उत्तम आबा कांबळे,रिक्षा संघटनेचे महेश चौगुले,महाराष्टृ प्रदेशाध्यक्ष आनंद चोरे, चरणदास वानखेडे,रफिक जमादार,पत्रकार महंमद आत्तार,जावेद मुल्ला,नझीर झारी,सुर्यकांत कुकडे, जहीर मुजावर,महेश सातवेकर,महंमद मिरजा आदी उपस्थित होते

लोकसंदेश न्यूज़ मीडिया प्राइवेट लिमिटेड मुंबई,
सांगली