Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA ; साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या बोरगांव पोलिसांनी आवळल्या मुसक्या. बोरगाव पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी.




SATARA
संभाजी गोसावी प्रतिनिधी सातारा

साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या बोरगांव पोलिसांनी आवळल्या मुसक्या. बोरगाव पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी....




सातारा. तालुक्यांतील बोरगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका गावात दहा दिवसांपूर्वी साडेतीन वर्षाच्या चिमुरडी अत्याचारांची घटना घडली होती. यातील फरारी आरोपीच्या अखेर बोरगांव पोलिसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी प्रमोद अंकुश लोखंडे यांस बोरगांव पोलीस पथकाकडूंन तपासकामी सोलापूर जिल्ह्यांतील वेळापूर गावच्या हद्दीतून बोरगांव पोलीस तपास पथकांने त्यास ताब्यांत घेतले. त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यांत आली. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन सातारा तालुक्यांतील बोरगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावामध्ये साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर चॉकलेट देण्यांचा बहाणा करीत सदर चिमूरडीला एकांतात खोलीत नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला या घटनेनंतर आरोपी पसार होता. सदर आरोपी येथील एका गावात शेतगडी म्हणून कामांस होता. सदरची घटना दि.८ ऑगस्ट रोजी बोरगांव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घडली होती. याबाबत मुलीच्या पालकांनी बोरगांव पोलीस ठाणे गाठले मात्र तोपर्यंत आरोपी लोखंडे हा पसार झाला होता घटनेचे गांभीर्य लक्षांत घेताच प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.चेतन्य मछले व श्रीमती. वर्षा डाळिंबकर मॅडम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक श्री. मछले यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगांव पोलीस पथक आरोपीच्या शोधात होते सदर आरोपीने आपला मोबाईल तिथेच ठेवल्यांने त्याचे लोकेशन ट्रेस होत नव्हते. आरोपी हा बोरगांव पोलिसांना मात्र गुंगारा देत होता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे बोरगांव पोलिसांना सदर आरोपी म्हणजे लोखंडे हा त्याच्या मूळगावी म्हणजे (जि.सोलापूर वेळापूर) येथे येणार असल्यांची माहिती बोरगांव पोलिसांना मिळाली. अखेर घटनेच्या दहा दिवसानंतर आरोपी मुळगावी बोरगांव पोलिसांच्या हाती लागला. बोरगांव पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल मा.अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक मा.चेतन मछले पोलीस उपनिरीक्षक श्रीमती.वर्षा डाळिंबकर मॅडम तसेच बोरगांव पोलीस ठाण्यांतील पोलीस कर्मचारी व आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली