SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सुनील पवार रूजू: प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय साधत काम करण्याची दिली ग्वाही
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी शुक्रवारी सुनील पवार यांनी रूजू झाले. सुनील पवार हे कल्याण डोंबिवली मनपाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. गुरुवारी त्यांच्या बदलीचा आदेश येताच आज शुक्रवारी दुपारी त्यांनी आयुक्त कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला.
यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी , संजय बजाज, सुरेश आवटी यांनी पदाधिकारी यांच्यावतीने तर उपायुक्त राहुल रोकडे यांनी प्रशासनाकडून नूतन आयुक्त सुनील पवार यांचे स्वागत केले. याचबरोबर महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी पदाधिकारी यांनीही आयुक्त पवार यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय साधत काम करण्याची ग्वाही नूतन आयुक्त सुनील पवार यांनी देत जनतेने महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले.
विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवणार : कामांचा ऍक्शन प्लॅन बनविणार : महत्वाची कामे पहिल्यांदा हाती घेणार : नूतन आयुक्त सुनील पवार यांची नगरसेवकांना ग्वाही :
स्थायी समिती सदस्य आणि नगरसेवकाकडून नूतन आयुक्त सुनील पवार यांचे स्वागत: स्थायी सभेनंतर आयुक्त पवार यांचा सत्कार करण्यात आला
सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून काम करत असताना विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवुन महत्वाच्या कामांचा ऍक्शन प्लॅन बनविणार आहे. अशा एक्शन प्लॅन नुसार महत्वाची विकासकामे पहिल्यांदा हाती घेणार असल्याची ग्वाही नूतन आयुक्त सुनील पवार यांनी मनपा नगरसेवकांना दिली.
स्थायी समिती सदस्य आणि नगरसेवकाकडून नूतन आयुक्त सुनील पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी स्थायी सभापती निरंजन आवटी आणि सर्वच स्थायी सदस्य महिला नगरसेविका यानी सभेनंतर आयुक्त सुनील पवार यांचा सत्कार सत्कार करीत स्वागत केले. यावेळी नगरसेवक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारतात त्वरित पूरपट्ट्याची परिस्थितीची पाहणी महापौरासह नवनिर्वाचित आयुक्त सुनील पवार यांनी केली
सांगलीच्या पुरपट्ट्यातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे असे आवाहन आयुक्त सुनील पवार व महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडून पुरभागाची पाहणी वेळी सूर्यवंशी आणि आरवाडे प्लॉट मधील नागरिकांशी बोलताना केले.. आपत्ती टीमने सहा कुटुंबांचे स्थलांतर करत पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धोका पत्करू नये व पुरपट्ट्यातील नागरिकांनी पाणी येण्याची वाट न पाहता सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे असे आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.
आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतात नूतन आयुक्त सुनील पवार यांनी तातडीनं पूर परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पुरबधित भागात जाऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपायुक्त राहुल रोकडे हे ही उपस्थित होते. सुरवातीला महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी तातपुरता निवारा केंद्राची पाहणी करीत सर्व त्या सोयीसुविधा देण्याबाबत प्रशासनाला आदेशीत केली
त्यानंतर सूर्यवंशी प्लॉट आणि आरवाडे प्लॉट येथील पूर भागाची पाहणी करीत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा सुचना केल्या. तसेच पाणी वाढण्याची शक्यता असल्याने कोणीही कसलाही धोका पत्करू नये आणि पाणी येण्याची वाट पाहण्यापेक्षा आत्ताच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे वझे आवाहन केले. याचबरोबर महापालिका प्रशासनाने सुद्धा पुरपट्ट्यात स्पीकरद्वारे जनजागृती करावी आणि पाणी वाढण्यापूर्वी नागरिकांना स्थलांतर करण्याबाबत सूचित करावे असे आवाहनही महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी केले. यावेळी सहायक आयुक्त नितीन शिंदे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, धनंजय कांबळे, प्रणिल माने आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली