SANGLI : भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव हा क्षण सर्व भारतीय नागरीकांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि राष्ट्रासाठी गौरवाचा आहे. या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये "हर घर तिरंगा" हा उपक्रम राबविणेत येत आहे.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव हा क्षण सर्व भारतीय नागरीकांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि राष्ट्रासाठी गौरवाचा आहे. या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये "हर घर तिरंगा" हा उपक्रम राबविणेत येत आहे.




SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली

भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव हा क्षण सर्व भारतीय नागरीकांसाठी अत्यंत अभिमानाचाआणि राष्ट्रासाठी गौरवाचा आहे या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये "हर घर तिरंगा" हा उपक्रम राबविणेत येत आहे.



भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी "आजादी का अमृत महोत्सव" अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये "हर घर तिरंगा" हा उपक्रम राबविणेत येत आहे.


भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव हा क्षण सर्व भारतीय नागरीकांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि राष्ट्रासाठी गौरवाचा आहे. या कालावधीत केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थासपना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर आणि नागकिरांच्या/ घरावर दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये राष्ट्रध्वज स्वंयस्फुर्तीने फडकविण्यात येणार आहे.

                 सांगली जिल्ह्याची तयारी

सांगली जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमामध्ये ६,०३,६३२ (अक्षरी-सहा लाख तीन हजार सहाशे बत्तीस) ध्वज आवश्यक असून त्याप्रमाणे ६,०३,६३२ (अक्षरी-सहा लाख तीन हजार सहाशे बत्तीस ) व त्यापेक्षा जास्त ध्वज उपलब्ध होतील.


हर घर तिरंगा उपक्रमासाठी सेवाभावी संस्था, विविध संस्था/संघटना, लोकप्रतिनिधी, मोठे उद्योग कंपन्या, वैयक्तिक तसेच इतर यांचेकडून ३,४८,१८३ (अक्षरी-तीन लाख अट्ठेचाळीस हजार एकशे त्र्यांशी) राष्ट्रध्वज उपलब्ध होणार आहेत. हर घर तिरंगा उपक्रमासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून प्रत्येकी ५ ध्वज याप्रमाणे राष्ट्रध्वज उपलब्ध होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील १४७८६ शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी ४५/- प्रमाणे ८८८२ इतके झेंडे स्वेच्छेने उपलब्ध करुन देणार आहेत. 
नागरीकांनी स्वंयस्फुर्तीने हर घर तिरंगा या कार्यक्रमामध्ये सहभाग घेवून स्वत: राष्ट्रध्वज खरेदी करुन घरावर फडकवावा.
हर घर तिरंगा उपक्रमामध्ये प्रत्येक शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापना/सहकारी संस्था /शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर आणि नागकिरांच्या घरावर  तिरंगा फडकविण्याचे नियोजन करणेत आलेले आहे. 



                       वाटप नियोजन

सदरचे राष्ट्राध्वज सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती मार्फत कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, शाळेचे विद्यार्थी, रेशन दुकानदार, अंगणवाडी सेविका, माजी सैनिक, सरपंच, ग्रामसेवक यांचेकडून घरोघरी जाऊन राष्ट्रध्वज दिले जाणार आहेत. तसेच महानगरपालिका / नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत मध्यें वार्डनिहाय अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत घरोघरी राष्ट्रध्वज वाटप केले जाणार असून राष्ट्रध्वज लावणेबाबत काय करावे व काय करु नये याबाबत सांगण्यात येऊन त्याची पत्रकेही वाटप करणेत येणार आहेत. अशा पध्दयतीने सर्व तयार केली जाणार आहे.

                          जनजागृती रुपरेषा

वृत्तपत्रे, एफ.एम.रेडिओ व सोशल मीडिया जिल्ह्यात व तालुक्यात विविध ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स तसेच रेल्वे, बसस्थानकावर आणि थिएटरमध्ये, पेट्रोलपंपावरुन प्रचार व प्रसिध्दी करणेत येत आहे. ग्रामपंचायतीमध्ये गाडीवर माईकद्वारे दवंडी दिली जाणार आहे. तसेच‍ डिजीटल बोर्डची गाडी तयार करुन सायंकाळनंतर गावामध्ये गाडी फिरवली जाणार आहे.सर्व शासकीय इमारतीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या लोगोची स्टॅंडी लावणेत येत आहेत. 



विद्यार्थी, पालक, कर्मचारी यांची सायकल रॅली व प्रभात फेरी काढली जाणार आहे तसेच चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेणेत येत आहे.
विविध घटकातील मान्यवरांचे प्रचार व प्रसिध्दीचे व्हिडिओ तयार करणेत आलेले आहेत. तसेच जिंगल टोन्स तयार करणेत येऊन घंटागाडीवर वाजवणेत येत आहे.

जिल्ह्यात व तालुक्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

दिनांक १३.०८.२०२२ ते १५.०८.२०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकविताना दररोज संध्याकाळी ध्वज खाली उतरवयाची आवश्यकता नाही.

सिंगल युज प्लास्टिक वरती बंदी आहे हे लक्षात घेऊन ध्वज हाताळणी, संग्रह, फडकविणे आणि उतरविल्यानंतर जतन करणे यासारख्या  कोणत्याही प्रक्रियेत सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणेत येऊ नये.
  
या अभियांनाअंतर्गत नागरीकांनी उत्स्फुर्तपणे आपल्या‍ घरावर दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी तिरंगा फडकवावा असे आवाहन या निमित्ता‍ने आपल्यामार्फत करणेत येत आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली