SANGLI :
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली
सांगलीतून अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचा खून...
कवठेपिरान हद्दीत वारणा नदीत मृतदेह आढळला : हात बांधून नदीत फेकले ...
सांगली आष्टा रोड येथून अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिक माणिकराव विठ्ठल पाटील (५४. इंद्रनील प्लाझा, सांगली) यांचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांचा मृतदेह बुधवारी दुपारी कवठेपिरान हदीत वारणा नदीत मागे हात बांधलेल्या अवस्थेत मिळाला....
दि. १३ रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान मोटारीसह ते तुंग येथील एका हॉटेल वरुन अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले होते. नंतर त्यांचा फोन लागत नसल्यामुळे तशी
फिर्याद त्याचा मुलगा क्रिमसिंह पाटील यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. त्यांचे मोबाईल लोकेशन तसेच त्यांची चारचाकी गाडी याचाही शोध सुरू असतानाच बुधवारी दुपारी वारणा नदीत ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह माहिती मिळाल्याने तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता तो पाटील त्यांचाच असल्याचे कळाले,त्यांची चारचाकी गाडी ही बंद अवस्थेत दिसल्याची माहिती अनोळखी व्यक्तींनी ही दिली होती
पाटील सातत्याने आष्टा परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबलेले असत. १३ रोजीही सायंकाळी बेंझ गाडीतून शोरूम परिसरातून पाटील निघाल्याचे निष्पन्न झाले आहे
पंचनामा केल्यानंतर वसंतदादा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
माणिकराव पाटील यांचे कोणाशीही वैर नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. पैशाचे गैरव्यवहार अशा बाबतीतही कोणते कारण नसल्याचे समोर आले नाही कोणत्या कारणाने हा खून झाला याचा शोध आता पोलिसांकडून होत आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली