SATATA : विनापरवाना दारु वाहतूक प्रकरणी पुसेगावात कारवाई. पुसेगांव पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATATA : विनापरवाना दारु वाहतूक प्रकरणी पुसेगावात कारवाई. पुसेगांव पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी.




SATATA
संभाजी गोसावी प्रतिनिधी सातारा.

*विनापरवाना दारु वाहतूक प्रकरणी  पुसेगावात कारवाई.  पुसेगांव पोलिसांची  प्रशंसनीय कामगिरी. 

  पुसेगांव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने पुसेगांव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये बुध कडून पुसेगांवकडे जाणाऱ्या मार्गावरुन चार चाकी गाडीतून विनापरवाना देशी दारु वाहतूक होत असल्यांची माहिती गोपनीय माहितीच्या आधारे पुसेगांव पोलिसांना मिळाली त्यानुसार श्री. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना या कारवाईबाबत नाकाबंदी करण्यांस आपल्या पोलीस ठाण्यांतील सहकार्यांना सांगितले. पोलिसांनी नाकाबंदी करत येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु केली दरम्यान.( एम एच 11 वाय१६१५) या क्रमांकाच्या गाडीची तपासणी करीत असता. सदर गाडीमध्ये देशी दारुचे बॉक्स आढळून आले तसेच तो विनापरवाना दारु वाहतूक करीत असल्यांचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले. यावेळी त्याची पोलिसांनी त्याची चांगलीच बोलती बंद करीत त्यांस पोलीस ठाण्यांत आणून गुन्हा दाखल केला.( प्रदीप सोमन्ना गौंडा वय ३५रा. पुसेगांव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडूंन जवळपास चार चाकी गाडी व दारुच्या बाटल्यांचा बॉक्स असा एकूण २ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यांत पुसेगांव पोलिसांना यश मिळाले. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ लोंढे तसेच पोलीस कर्मचारी जगन्नाथ लबाळ, संभाजी माने,पोपट बिचकुले,विलास घोरपडे सचिन जगताप आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली