श्रावण मास व्रतवैकल्ये ऐशानी श्रावणसरी प्रदर्शणास २० ऑगस्ट रोजी सुरुवात.. मंजिरीताई गाडगीळ
श्रावण मास म्हणजे व्रतवैकल्ये आणि आनंदाचे दिवस, आणि हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी ऐशानी ग्रुप घेऊन आले आहे, ऐशानी ग्रुपच्या अध्यक्ष मंजिरीताई गाडगीळ, स्वाती भिडे, रिटा शहा, उज्वला चाफळकर यांनी हे प्रदर्शन आयोजित केले असून श्रावणसरी प्रदर्शन मध्ये गृह सजावट, विविध कपडे, गुंतवणूकी संबधित माहिती, २ व ४ चाकी गाडी व चमचमीत खाद्यपदार्थांची रेलचेल. ऐशानी ग्रुप च्या महिलांनी हे प्रदर्शन आयेजित केले आहे.
याबद्दल माहिती देताना आयोजक म्हणाल्या सांगली, मिरज इचलकरंजी, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई मधुन निवडक आणि दर्जेदार स्टॉल आपल्या प्रदर्शन मध्ये सहभागी होत आहेत, गृहिणी आणि स्वयरोजगार करणाऱ्या अनेक महिलांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच आमचा उद्देश आहे.
सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी राजमती भवन, नेमिनथनगर ग्राउंड जवळ, विश्रामबाग सांगली येथे दि. २० ऑगस्ट आणि २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते साय ९ पर्यंत प्रदर्शन संपूर्ण कुटुंबासाठी खुले आहे. प्रदर्शना चे उद्घाटन सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या हस्ते दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि भरपूर खरेदीचा आनंद घ्यावा.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली