KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
साक्षी वाळवेकर ‘मिस इचलकरंजी’ तर
सोनाली सुर्यवंशी ‘मिसेस इचलकरंजी’च्या मानकरी ...
इचलकरंजी फेस्टिवल 2022 आयोजित मिस अॅन्ड मिसेस इचलकरंजी सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इचलकरंजी’ गटात साक्षी वाळवेकर आणि ‘मिसेस इचलकरंजी’ गटात सोनाली सुर्यवंशी या प्रथम क्रमांकांच्या मानकरी ठरल्या.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने इचलकरंजी फेस्टिवलच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलची सांगता मिस अॅन्ड मिसेस इचलकरंजी स्पर्धेने करण्यात आली. प्रारंभी मानाची श्री गणेशाची आरती शहरातील तृतीयपंथीयांच्या हस्ते व फेस्टिवलच्या संयोजिका सौ. मोश्मी आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. फेस्टिवलच्या माध्यमातून सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करुन महिला आणि युवतींसाठी एक चांगला मंच उपलब्ध करून देण्यात आला होता. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मोठ्या संख्येने महिला व युवतींनी सहभाग नोंदविला होता. आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पेनतून आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व संयोजिका सौ. मोश्मी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये ‘मिस इचलकरंजी’ स्पर्धेत साक्षी वाळवेकर (प्रथम), ऐश्वर्या पाटील (द्वितीय) आणि श्वेता नाईक (तृतीय) या विजेत्या ठरल्या. तर निधी केसवानी (मिस बेस्ट स्माईल), नंदिनी डोंगरे (मिस बेस्ट अॅटीट्यूड), प्रियांका कोकरे (मिस बेस्ट पर्सनॅलिटी), दीपा कडलगे (मिस बेस्ट ड्रेसिंग), साक्षी उपाध्ये (मिस बेस्ट वॉक), प्रियांका मिरजकर (मिस टॅलेंटेड) च्या मानकरी ठरल्या. त्याचबरोबर ‘मिसेस इचलकरंजी’ स्पर्धेत सोनाली सूर्यवंशी (प्रथम), स्वप्नाली पाटील (द्वितीय), रेणुका तांबेकर (तृतीय) या विजेत्या ठरल्या. तर कोमल शिंदे (मिसेस बेस्ट स्माईल), मेघा उत्तुरे (मिसेस बेस्ट अॅटीट्यूड), शिवानी जाधव (मिसेस बेस्ट पर्सनॅलिटी), गीता भागवत (मिसेस बेस्ट ड्रेसिंग), अर्चना आवळेकर (मिसेस बेस्ट वॉक), सानिया मुजावर (मिसेस टॅलेंटेड ) च्या मानकरी ठरल्या.
विजेत्या स्पर्धकांना फेस्टिवल संयोजिका सौ. मोश्मी आवाडे आणि अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी मधु शिंदे, नजमा शेख, शुभांगी शिंत्रे, सानिका आवाडे, समायारा आवाडे, सोनाली तारदाळे, गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, शितल सूर्यवंशी, ललिता पुजारी, अहमद मुजावर, शेखर शहा, तात्यासाहेब कुंभोजे, नरेश हरवंदे, राहुल घाट, सुरज राठी, संग्राम सटाले, मुजम्मिल सय्यद, सत्येन राजमाने, अक्षय आळंदे आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली