KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
आमदार फंडातील दहा टक्के निधी पानंद रस्ते विकासासाठी देणार -आमदार राजू बाबा आवळे
सरकारला अदानी-अंबानी यांनाच मोठे करायचे आहे.सरकारच्या या प्रवृतीमुळे देश हुकमशाहीकडे चालला आहे, ईडी कार्यालय व न्याय देवतेचे कार्यालयात हुकूमशहा यांची मक्तेदारी झालीआहे. सर्वसामान्य जनतेच्या सर्व योजना बंद करून देशात फक्त गरीब आणि श्रीमंत अशी दोनच स्तर ठेवण्याचे काम हे सरकार करत आहे येणाऱ्या 2024 पासून सर्व ग्रामपंचायतला मिळणाऱ्या सरकारी योजना बंद होतील, सध्या सर्वसामान्य जनतेला मिळणारे रेशन धान्य बंद करण्याचा घाट या सरकारने घातला असून काँग्रेस पक्षाने ज्या-ज्या योजना सर्वसामान्य जनतेच्या सर्वांनी हितासाठी चालू केले आता त्या बंद करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.अखंड भारत देशाचे सरकार दोनच नेते चालवत असून खऱ्या अर्थाने लोकशाही संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे, इथून पुढे आमदार फंडातून दहा टक्के निधी हा पानंद रस्ते विकासासाठी मी देणार आहे. असे मत आमदार राजु बाबा आवळे यांनी व्यक्त केले.
ते कुंभोज येथील पंचदिप मळा व तोरस्कर मळा येथील रस्ता कामांच्या शुभारंम प्रसंगी बोलत होते.सरपंच अरूणादेवी पाटील अध्यक्षस्थानी होत्या त्या म्हणाल्या की आत्तापर्यंत आमदार राजू बाबा आवळे यांच्या आमदार फंडातून कुंभोज गावासाठी अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला असून, मोठ्या प्रमाणात कुंभोज गावचा विकास झाला आहे. यावेळी राजारामचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, त्यांनी येणाऱ्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन निश्चित असून मतदारांनी कौरवांचा नाद सोडून पांडवांच्या संगतीत येऊन परिवर्तन घडवावे असे उद्गार काढले, परिणामी या वेळी पुन्हा कार्यक्रम रस्ता शुभारंभाचा व प्रचार मात्र बावडा कारखान्याचा अशी चर्चा उपस्थितात रंगली ,यावेळी कोल्हापूरचे नगरसेवक मोहन सालपे,माजी सरपंच प्रकाश पाटील,राजकुमार अल्ल,सरपंच अरूणादेवी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
पंचदिप मळ्यात आमदार राजुबाबा आवळे यांच्या फंडातून मंजूर रस्त्या कामांचा शुभारंभ आमदार श्री.आवळे यांच्या हस्ते तर आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून मंजूर रस्ता कामांचा शुभारंभ नगरसेवक मोहन सालपे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शरदचे संचालक आप्पासाहेब चौगुले,माजी उपसभापती राजकुमार भोसले,माजी सरपंच माधुरी घोदे डाॅ.धर्मवीर पाटील,अशोक आरगे,भारत भोकरे,दाविद घाटगे,अजित देवमोरे,अमर बंडगर, आप्पासाहेब पाटील,शिवाजी किबिले,सदानंद महापूरे, कॉन्ट्रॅक्टर शितल हेरले, सचिन पुजारी,सचिन कोळी, उपस्थीत होते.किरण माळी यांनी स्वागत केले स्नेहा पाटील यांनी आभार मानले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,
सांगली