SATARA : कराडमध्ये दाजीकडूंन मेव्हुण्यांचा धारदार शस्त्रांने खून...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA : कराडमध्ये दाजीकडूंन मेव्हुण्यांचा धारदार शस्त्रांने खून...SATARA
लोकसंदेश प्रतिनिधी संभाजी गोसावी

कराडमध्ये दाजीकडूंन मेव्हुण्यांचा धारदार शस्त्रांने खून...
कराड पोलिसांनी आरोपीच्या अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या....


घरगुती कारणांतून दाजीने मेहुण्यांचा धारदार शस्त्रांने खून केल्याची घटना उंडाळे येथील माळी वस्तीमध्ये शुक्रवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास घडली घटनास्थळावरून फरार आरोपीला कराड तालुका पोलिसांनी अवघ्या अडीच तासांत ताब्यांत घेतले. सचिन वसंत मडले ( वय ३५ मूळ या.रेठरे खुर्द सध्या रा.उंडाळे ता.कराड ) असे खून झालेल्या तर अवधूत हनुमंत मदने ( वय ४२रा. रेठरे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन उंडाळेच्या पश्चिमेंस कराड-रत्नागिरी रोडच्या बाजूस असलेल्या माळीवस्ती या ठिकाणी शनिवारी रात्री अनंत चतुर्थीच्या दिवशी खून झाल्यांची धक्कादायक घटना घडली. रेठरे खुर्द येथील मूळ रहिवासी असलेले सचिन मंडले हे दूध व्यवसाय निमिंत्त उंडाळे येथे भाड्यांच्या घरात राहण्यांस आहेत. अवधूत मदने यांनी धारदार शस्त्रांने मेहुणा सचिन मंडले याच्यांवर गंभीर वार केले. यामध्ये तो जखमी झाला होता सचिनला उपचारांसाठी कराड येथे नेण्यांत आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांस मृत घोषिंत केले. 


कराड तालुका पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कराड तालुका पोलिसांनी संशयित आरोपी अवधूत माने याचा शोध घेण्यांस सुरुवात केली. कराड पोलिसांनी अवघ्या काही तासांत मध्यरात्री आरोपीला करवडी गावातून त्यांस ताब्यांत घेतले.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली