KOLHAPUR
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
इचलकरंजी गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या कबनूर येथील युवकाचा मृतदेह शिरढोण पंचगंगा नदी पात्रात सापडला
इंचलकरंजी येथे घरगुती गणेश मूर्ती विसर्जन करताना पंचगंगा नदीवरील रुई बंधार्यावरू सोमवारी दुपारी तीन घरगुती विसर्जन करताना स्वप्नील मारुती पाटील (वय २२, रा. दत्तनगर, कबनूर) हा तरुण तीन दिवसांपूर्वी नदीत वाहून गेला होता.
बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास स्वप्नील वाजण्याच्या सुमारास पंचगंगेत बुडाला होता. यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने इंगळी आपती व्यवस्थापन समिती व रेस्क्यू फोर्स आणि पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. बुधवारी शिरढोण ता. शिरोळ येथे पंचगंगा नदीत त्याचा मृतदेह आढळला. ही माहिती समजताच स्वप्नीलच्या नातेवाईकांबरोबर राजेशाही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह पाहताच आई, वडील, बहिणी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. हे पाहून उपस्थितांचे काळीज हेलावुन गेले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली