KOLHAPUR
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
दानोळीत बालचमुंकडून प्रबोधनात्मक् पथनाट्य सादर....
येथील कुमार विद्या मंदिर दानोळी शाळा नंबर 1 च्या मुलांनी रिमझिम कोसळणाऱ्या पावसाला न जुमानता सलग दोन दिवस् संद्याकाळी 7 ते 11 या वेळेत गावातील संपूर्ण मंडळांसमोर लोकमान्यांचा उद्देश सफल करण्यासाठी प्रबोधनात्मक संदेश पथनाट्याद्वारे सादर केला.
यामध्ये डॉल्बीमुक्त गणेश् उत्सव्, निर्माल्य कुंडातच विसर्जन करावे,फटाकेमुक्त्त् गणेशोत्सव् ,धर्म,जाती विरहित गणेशोत्सव्,देशप्रेम जपणारी गाणी लावली पाहिजेत,धांगडधिंगा विरहित गणेशोत्सव,पारंपरिक खेळ जपले पाहिजेत हा संदेश देताना पर्यावरण जपलेच पहिजे हा संदेश् विविध् फलक् दाखवुन् देणेत आला.शेवटी 'पर्यावरण वाचवा,देश वाचवा 'अशी शपथ सर्वांनी घेण्यात आली.या बालचमुंनी प्रत्येक मंडळाला एक पारिजातकाचे रोप भेट देऊन कार्यक्रमाचा शेवट गोड केला.
हा विशेष उपक्रम घेण्यात शाळेचे मुख्याध्यापक मा.दादासो भोसले सर व सर्व शिक्षक स्टाफ तसेच शा.व्य.कमिटीचे अध्यक्षा व् सर्व सदस्य, विस्ताराधीकारी अनिल ओमांसे साहेब,केंद्रप्रमुख श्री.जाधवर साहेब यांचे विशेष मार्गदर्शन व प्रेरणा लाभले.
वर्षभर नावीन्यापूर्ण उपक्रम राबवणारी व गुणवत्तेत् सरस असणारी ही शाळा या विशेष उपक्रमामुळे पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली