SANGLI तू लाख हिफाजत कर ले.. तू लाख करे रखवाली.. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजडा खाली..!! ....... पर्यूषण पर्वाच्या निमित्ताने..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI तू लाख हिफाजत कर ले.. तू लाख करे रखवाली.. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजडा खाली..!! ....... पर्यूषण पर्वाच्या निमित्ताने..




SANGLI
तू लाख हिफाजत कर ले.. तू लाख करे रखवाली.. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजडा खाली..!!

मनुष्य जीवन क्षणभंगुर आहे..मृत्यू कोणाला कधी गाठेल हे कोणालाच सांगता येत नाही. मृत्यू नंतर माणसाचं नाव.. गाव.. पत्ता.. हुद्दा सारं कांही काढून फक्त मडं /प्रेत ही उपाधी शिल्लक राहते.. साडे तीन फुटाचा खड्डा किंवा सात मण लाकूड वाट्याला येतं.. त्यामध्ये किंचितही वाढ होत नाही..


उंची महालात राहणाऱ्या व लाखो रुपयांच्या एसी बाथरुममध्ये शाॅवर खाली अंघोळ करणाऱ्या माणसाला मृत्यू नंतर शेवटची अंघोळ रस्त्यावरच घातली जाते.!

आयुष्यभर रक्ताचं पाणी करुन जमवलेली संपत्ती मरणानंतर इथेच राहते..फक्त चांगली कर्मे मात्र साथ करतात..


विनायक मेटे.. सायप्रस मिस्त्री यांचे अपघाती मृत्यू मनाला वेदना देणारे आहेत.. ऐन उमेदीच्या काळात कर्तबगार माणसांचा मृत्यू ही फार मोठी राष्ट्रीय हानी असते

 कारण या माणसांचे परिश्रम सामान्य माणसाच्या भाकरीशी जोडलेले असतात.. अशा माणसाचं जगणं लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा देणारी असते.. असो. स्वतःसाठी जरुर जगा परंतु दुसऱ्यासाठी जगणारी माणसे ही कधीच मरत नाहीत.. ते अमर असतात कारण त्यांची कर्मे चांगली असतात.. शक्य होईल तेवढी चांगली कामे करा.. दुसऱ्याला भाकर देणारे व्हा.. अहिंसक जीवन जगा.. कोणाचीही पिळवणूक
शोषण करु नका.. सत्य मार्गाने जगा.. कोणाचाही अपमान करु नका.. गरिबांना छळू नका.. धनवानांचा द्वेष करु नका.. घाम गाळून मिळवलेल्या धनातून दान करा.. मी पणा गळून पडू द्या.. प्रचंड.. अवाढव्य महासागर.. ज्वालामुखी.. भूकंप.. महापूर यांच्यावर चिंतन करा.. निसर्गावर आक्रमण करु नका.. क्षमाशील व्हा.. क्रोधी होऊ नका.. क्षमा माणसाला महान बनवते तर क्रोध लहान बनवते.. वाणी आणि करणी एकच असू द्या.. कठोर बोलू नका. झालेल्या चुका सुधारा.. माणसं जोडा.. आपापल्या धर्माप्रमाणे उपासना करा.. मंदिरात जा.. निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करा.. सार्वजनिक संस्थांच्या कामात सहभागी व्हा.. कोणालाही दुखवू नका.. कपटाचार टाळा.. सार्वजनिक संस्था व जनतेच्या पैशाचा वापर स्वतःसाठी करु नका.. शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवा.. शेतकरी.. शिक्षक.. सैनिक.. कामगार.. महिला व बालकांना जपा.. काटकसर करा.. सतत कामात व्यस्त रहा.. वाचनाचा छंद जोपासा.. आई - वडील व जेष्ठ नागरिकांचा सन्मान करा.. शिक्षण.. आरोग्य.. सार्वजनिक हितासाठी झटा..!! इथं माझं काहीही नव्हते.. नाही व नसणार याचे भान राहिले तर मृत्यूची भिती कधीच वाटणार नाही.. सर्व धर्माचा हाच सार आहे.. आणि साऱ्या साधू - संतानी हेच सांगितले आहे..!!


प्रा. एन.डी.बिरनाळे.. सांगली 
सेक्रेटरी
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कोल्हापूर
___________________________________________

 वरील सर्व सत्यच आहे .....कारण मानव जातीने आजच्या युगात आपलं मरणच विसरलेल आहे.... त्याला वाटतंय मी हजार ...दोन हजार वर्षे जगणार आहे ...आता मग तो काय करतो ....लोकांच्या मुंड्या मुरगाळून .....भ्रष्टाचार करून... काहींना काही प्रकार करून..... लोकांची छळवणूक करून पैसे मिळवतो .....आणि जी पोर आहेत... अशांची पोरं म्हणजे चोर च...त्यांच्यासाठी हा सगळा जीवाचं रान करून हे सर्व त्याच्यासाठी करत असतो ... प्रत्येक गोष्ट घटना आयुष्यात  आपल्या आयुष्यासाठी एक धडा असतो.
 ....आता सायरस मेस्त्री असतील किंवा मोठे मोठे कलाकार असतील आपल्या आजूबाजूचे बरेच लोक....   ही सर्वातचांगली माणसं होती ..या जगातून आपल्यातून ..निघून गेलेली आहेत.... परंतु आपल्या येथील काही भ्रष्टाचारी ,उच्चपदस्थ अधिकारी, उच्चपदस्थ मंत्री, राजकारणी यांना अजून हे कळायला अजून एक शंभर वर्षे तरी जावे लागतील.. असं मला वाटतं .. कारण असं आहे कोटी कोटीचा भ्रष्टाचार करून हे सर्व जण जनतेच्या पैशातूनच कमवत असतात,अधिकारी आपल्या खुर्च्यावर बसून लोकांचे कामच करत नाहीत.... त्यांना काय वाटतंय की ,आम्ही उच्च पदावर आहोत म्हणजे लोकांचे काम न करता त्यांच्यावर आम्ही उपकारच करतो आहोत...असा एक गैरसमज त्यांच्या मनात झालेला असतो आता अशा भ्रष्टाचारी लोकांच्या बायका, मुली, मुले, या जीवनात त्याच्या माघारी काय करत असतात हे त्याला ज्ञात नसते... आणि अशा पद्धतीने मिळवलेला पैसा अशा मार्गानेच जाणार असतो... आणि ही अवलाद एवढं करून सुद्धा जीवनाच्या निवृत्तीनंतरच्या काळात कुठल्यातरी वृद्धाश्रमातच आपल्याला भेटेल.... याचाच अर्थ कराल तसंच भराल....सायरस मिस्त्रीचा एक्सीडेंट हा एक धडा आपल्याला देऊन जात आहे... याचा जरा जरी बोध या जनतेला त्रास देणाऱ्या भ्रष्टाचारी राजकारण्यांनी व अधिकारीनी घेतला तरी भरपूर आहे...

 (हा लेख ही सर्व भ्रष्टाचारी वाचतीलच परंतु हे सर्व  मला लागू होत नाही असे या अवलादीना वाटेल)
संपादक : लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली