MUMBAI: राष्ट्रीयसेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख होणार - मंत्री चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा घेतला आढावा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI: राष्ट्रीयसेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख होणार - मंत्री चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा घेतला आढावा
राष्ट्रीयसेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख होणार

- मंत्री चंद्रकांत पाटील

 

MUMBAI 

लोकसंदेश न्यूज नेटवर्क


उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा घेतला आढावा

 मुंबईदि. 13 : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावीसामाजिक प्रश्नांची जाणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या आता पाच लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
            एसएनडीटी विद्यापीठ येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत किंवा सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी झाला पाहिजे. सामाजिक अडचणीवर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नेतृत्व गुण धारण करून लोकशाहीचा विकास आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ७० हजारावरून  आता ५ लाख करण्यात येणार आहे. ही संख्या जवळपास दीडपट वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव विद्यार्थ्यांचा खर्च राज्य शासन करेल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.            विद्यार्थी हे आपल्या देशाचे भवितव्यराष्ट्राची संपत्ती व उद्याची उमेद आहे. राज्यातील शैक्षणिक परिस्थिती पाहता आणि भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्णदर्जेदार आणि कमी खर्चात उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे मोठे आव्हान आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

            शासकीय महाविद्यालय आणि खाजगी महाविद्यालय यामधील शैक्षणिक शुल्कामध्ये मोठी तफावत आहे. शैक्षणिक वृद्धीसाठी ही तफावत कमी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार उच्च शिक्षण मिळाले पाहिजे.यासाठी उच्च शिक्षण विभागांतर्गत नावीन्यपूर्ण शैक्षणिक योजना, विविध उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट नियोजन करावेतसेच शैक्षणिक चळवळ सुरू राहावी  यासाठी क्रीडासांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी विभागाने नियोजन करावेअसेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.नॅक मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांनी  तीन महिन्यात प्रक्रिया सुरू करावी

            राज्यशासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने अकृषी विद्यापीठसंलग्न महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच दर पाच वर्षांनी नॅक पुनर्मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. राज्यातील अद्यापही नॅक मूल्यांकन पूर्ण न केलेल्या महाविद्यालयाने पुढील तीन महिन्यात  नॅक  मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू न केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ,सांगली