SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली येथील मनेराजुरीतील
स्वातंत्र्य सेनानी आदरणीय बाबू नदाफ यांचे निधन.......
भारतीय स्वातंत्र्य लढा हा आपला भारत देशा साठी आणि जागतिक पातळीवर चा ऐतिहासिक लढा आहे. ८ ऑगस्ट १९४२ चा तो क्रांतिकारी दिवस ....
म. गांधी यांनी संपूर्ण देशातील जनतेला " करा किंवा मरा" हा निर्वाणीचा मंत्र दिला तर इंग्रजांना " छोड़ो भारत " शेवटचा आदेश दिला.
त्यावेळी पूर्ण देशातील सर्व जाती धर्माची जनता रस्त्यावर उतरली आणि स्वातंत्र्य लढा सुरू झाला.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ,क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी,
क्रांती अग्रणी जी डी बापू लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, बर्डे गुरुजी यांचेसोबत सांगली जिल्ह्यात क्रांतिकारकांची फौज उभी राहिली.
त्या" तुफान सेने "तील एक क्रांतिकारक सेनानी म्हणजे बाबू हसन नदाफ. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावातील एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील जन्माला आलेले आदरणीय बाबू नदाफ हे गांधीजी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने भारावून जाऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. भूमिगत होऊन इंग्रजांच्याव इंग्रज सरकारच्या विरोधात त्यांनी युद्ध छेडले, तारा तोडणे,पोस्ट जाळणे, रेल्वे रूळ उखडणे, रेल्वे लुटणे अशा धाडसी पणाने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र चळवळीत त्यांनी भाग घेतला होता....
अशा या स्वातंत्र्यसैनिकास लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
आल्लाह त्यांना जन्नत नसीब आता करे.....
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली