SANGLI: सह्याद्रीच्या कुशीतील सागरेश्वर अभयारण्याचे सौदर्य पर्यटकाना खुणावतेय: सागरेश्वरच्या हिरवाईची पर्यटकाना भुरळ : सांगलीच्या निसर्ग प्रेमी ग्रुपने लुटला आनंद :

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: सह्याद्रीच्या कुशीतील सागरेश्वर अभयारण्याचे सौदर्य पर्यटकाना खुणावतेय: सागरेश्वरच्या हिरवाईची पर्यटकाना भुरळ : सांगलीच्या निसर्ग प्रेमी ग्रुपने लुटला आनंद :
SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क


सह्याद्रीच्या कुशीतील सागरेश्वर अभयारण्याचे सौदर्य पर्यटकाना खुणावतेय: सागरेश्वरच्या हिरवाईची पर्यटकाना भुरळ : सांगलीच्या निसर्ग प्रेमी ग्रुपने लुटला आनंद :


सागरेश्वरमध्ये चित्ता आणण्यासाठी भाजपा नेते घालणार देवेंद्र फडणवीस यांना साकडे : माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची माहितीसह्याद्रीच्या कुशीतील डाँगर माथ्यावर असणारे सागरेश्वर अभयारण्याचे सौदर्य पर्यटकाना खुणावत आहेत:सांगली जिल्ह्यातील सागरेश्वरची हिरवाई पर्यटकाना भुरळ घालत आहे: सागरेश्वरच्या निसर्ग सौदर्याचा सांगलीच्या निसर्ग प्रेमी ग्रुपने रविवारी आनंद लुटला तर...


  सागरेश्वरमध्ये चित्ता आणण्यासाठी भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणार असल्याची माहिती माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.


सांगली जिल्ह्याच्या पलूस कडेगाव तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सागरेश्वर अभयारण्य आहेत. डॉगरावर वसलेल्या या सागरेश्वर अभ्यारारण्यात माकडे, हरीण काळवीट, मोर, यासह 5 हजारांहून अधिक वन्य पशु प्राणी आहेत. याचबरोबर सागरेश्वरच्या सौदर्याची सफर करताना अनके वन्य प्राणी हे मुक्तपणे फिरताना पाहायला मिळतात. तर सभोतालचे निसर्ग सौन्दर्य पर्यटकांना मानमोहून टाकते. त्यामुळे पर्यटकांचा मोठा ओढा सागरेश्वरकडे आहे. या सौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक सागरेश्वरला भेट देत असतात
सांगलीचे हे पर्यटन सौन्दर्य असणाऱ्या सागरेश्वरला रविवारी सांगलीतील निसर्गप्रेमी ग्रुपने भेट देऊन सागरेश्वरची सैर केली. यावेळी निसर्ग प्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी सागरेश्वरच्या निसर्गाचा आनंद लुटला.पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठे अभयारण्य म्हणून परिचित असणाऱ्या सागरेश्वरमध्ये चित्ता आणण्यासाठी भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.पर्यटन वाढावे यासाठी चित्ता आणावा यासाठी भाजपानेते पृथ्वीराज देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तशी मागणी करणार आहेत
 : काय झाडी काय डोंगुर हा डायलॉग सर्वाना माहिती आहेच मात्र हे निसर्ग सौदर्य पहायचे असेल तर सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्याला नक्की भेट देऊन पर्यटन वाढवावे असे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे
__________________________________________


या बातमीचे प्रायोजक आहेत निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, सांगली..

www.nisargbhumi.com
_______________________________________________

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली