SANGLI:
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यासह राज्यात लंपी आजाराने थैमान घातले आहे सांगली जिल्ह्यात एका जनावराचा यामुळे मृत्यू झाला असून 93 जनावरांना लागण झाली आहे जिल्ह्यातील सुमारे 14 लाख पशुधन यामुळे धोक्यात आले आहे त्यामुळेच प्रशासनाने तातडीने बाधित जनावरांसाठी क्वाराटिन सेंटर व सर्व जनावरांना तातडीने लसीकरण करावे अन्यथा जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात सोडू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला
खराडे म्हणाले सांगली जिल्ह्यात वेगाने लम्पी रोगाचा फैलाव होवू लागला आहे पलूस तालुक्यातील मोराळे गावात एका जनावराचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे तर शंभरावर जनावरांना याची लागण झाली आहे कोरॉना सारखाच हा आजार संसर्गजन्य असून मच्छर, गोचीड, व माशा सह अन्य कीटकाच्या माध्यमातून याचा प्रसार होत आहे जनावराच्या अंगावर पुरळ उठणे, फोड्या उठणे, गाठी येणे,ताप येणे. नाक, तोंड, डोळ्यात व्रण उठणे , पायावर जखमा होणे, गर्भपात होणे, भूक मंदावणे, दूध कमी होणे आदी या रोगाची लक्षणे आहेत
लंपि हा विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे पशुधन या रोगाच्या विळख्यात सापडले आहे जिल्ह्यात सुमारे सव्वा तीन लाख गायी व बैल, सुमारे पाच लाख म्हशी, साडेचार लाख शेळ्या, दीड लाख मेंढ्यांची संख्या आहे एकूण पंधरा लाखाच्या आसपास पशुधन आहे हे पशुधन वाचविण्यासाठी लपी प्रतिबंधक लसीकरनाशीवाय पर्याय नाही सद्या लसीकरण सुरू आहे मात्र लसीची उपलंभडता कमी आहे त्यामुळे लसीकरणाच्या वेगही कमी आहे आवश्यक तेवढ्या लसी उपलंबध करून वेगाने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे दुग्ध व्यवसायावर ग्रामीण सांगली जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे शेतकऱ्यांनीही काही काळजी घेणे आवश्यक आहे आजारी जनावरे स्वत्रंत बांधावीत, गोठा स्वच्छ ठेवावा, गोचीड, डास, माशा होवू नयेत यासाठी औषध फवारणी करावी आदी बाबी कराव्यात व. प्रशासनाने ही बांधीत जनावरांसाठी क्वारटिन सेंटर सुरू करावीत लसीकरण तातडीने करावे अन्यथा जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात सोडू असा इशारा खराडे यांनी दिला आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली